पुलगावात अतिक्रमणावर चालले गजराज

पुलगाव/प्रतिनिधी शहरातील देवळी नाका ते स्टेशन चौकापर्यंत रविवार १० रोजी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम महसूल विभाग, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग तसेच इतर विभागाच्या संयुक्त वतीने राबविण्यात आली. विशेष म्हणजे, अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत आधीच अतिक्रमणधारकांना माहिती देण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे अतिक्रमणधारकांनीच काढली होती. रेल्वे स्टेशन ते आर्वी रेल्वे गेट पर्यंत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. परंतु, एकाच मार्गावरील अतिक्रमण धारकांनी आपली अतिक्रमणे काढली नाही. प्रशासनानेही याला हात लावला नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्वातंत्र्यानंतर सिंधी बांधवानी अनेक वर्षे रोजगाराचे साधन म्हणून येथे दुकाने थाटली होती. परंतु, मागील अतिक्रमण हटाव मोहिमेत अनेक विनंती, आर्जवानंतरही अतिक्रमण काढण्यात आले नाही.

नवीन अतिक्रमण रेल्वे भिंत व रस्ता यामध्ये असून वाहतुकीला अडथळा होत असताना त्यावर प्रशासन मेहरबान का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. रविवारी स्टेशन चौक ते वर्धा रोड या भागात येणार्या ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन, बस स्थानक, विश्रामगृह या भागातील अतिक्रमणे दोन जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आली. र्झीश्रसरेप-थरीवहर यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय आश्रमा, सहाय्यक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण, नायब तहसीलदार अजय झिले, ठाणेदार प्रमोद बाळगुले, पोलिस उपनिरीक्षक संदीप एकबोटे, सदानंद वडतकर, सोनकुसरे, जाधव तसेच महसूल विभागाचे डेहनकर, हांडे, भरणे उपस्थित होते.