राज्यातील तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे रोजगार देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अहमदनगर/प्रतिनिधी बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून या माध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन दिला जाणार आहे. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेतील करारातूनही २ लाख तरूणांसाठी रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिरास श्री. शिंदे यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटनमहसूलमंत्री तथा जिल्ह्याचेपालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलयांच्या हस्त झाले. याप्रसगीकौशल्य, रोजगार, उद्योजकताव नाविन्यता विभागाचे मंत्रमंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कडिले,नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्णगमे, जिल्हाधिकारी सिध्दारामसालीमठ,जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,महानगरपालिका आयुक्त डॉ.पकंजजावळे, कौशल्य विकास विभागाचेनाशिक विभागीय उपायुक्त सुनिल सैंदाणे, जिल्हा कौशल्य, रोजगार वउद्योजकता सहायक आयुक्त निशांतसुर्यवंशी आदी उपस्थित होते.

राज्यात नागपूर, लातूरनंतरअहमदनगर येथे नमो विभागीयरोजगार मेळावा होत आहे. असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेम्हणाले, शासन हे सर्वसामान्यलोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्नकरत आहे. राज्यात सर्व विभागातरोजगार मेळावे आयोजित केलेजात आहेत. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातअडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून लाखो तरूणांना रोजगार मिळून तरूणत्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.