बादेतील कर्मचारी वेतनासाठी ७५ किमी पायी; व्यवस्थापनाला आपलीच घाई!

वर्धा/प्रतिनिधी बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर व सुरक्षारक्षक कर्मचार्यांनी आपल्या ४८ महिन्यांच्या पगारासाठी १२ ते १४ डिसेंबर दरम्यान प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांच्या नेतृत्वात नागपूर अधिवेशनावर पायदळ आक्रोश मोर्चा काढून आपली व्यथा मांडली. नागपूर येथून आमदार बच्चू कडू यांनी उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कर्मचार्यांच्या मागणीवर तात्काळ मार्ग काढण्यास सांगितले. पाटील उयांनी लगेच दखल घेऊन १७ जानेवारी २०२४ पर्यंत शिष्यवृत्ती जमा करण्यात येत असून कर्मचार्यांचे वेतन करण्यासाठी सर्व प्रयत्न तात्काळ करण्याचे ओशासन दिले. मात्र, बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व्यवस्थापन त्याच दिवशी आपल्या राजकीय भवितव्यासाठी पवार यांच्या मोर्चात शेकडो गाड्या घेऊन सहभागी झाल्याने कर्मचार्यांच्या वेतनासाठी व्यवस्थापन गंभीर नसल्याची भावना आंदोलन कर्मचार्यांनी व्यक्त केली.

बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयतील् कर्मचार्यांचे ४८ महिन्यापासून वेतन थकीत असून दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाला अर्धे वेतन करून त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम प्रशासन व व्यवस्थापनातर्फे करण्यात आले. त्यानंतर वेतन करण्यात आलेे नाही. कर्मचार्यांचे ४८ महिन्यांचे वेतन थकीत ठेवून नागपूर उच्च न्यायाल्याने सप्टेंबर २०२१ नंतर नियमीत वेतन करण्याचे आदेश देऊनसुद्धा प्रशासनाने वेतन न केल्याने आधीचे ३५ व त्यानंतर १३ असे ४८ महिन्यांचे वेतन थकीत राहिले. न्यायलयाच्या आदेशाचा अवमान करणार्या प्रशासनाला कर्मचार्यांची किंमत नाही. कर्मचार्यांचे कुटुंब उपाशी मरत असताना राजकीय यात्रेवर लाखोने खर्च करण्यात आल्याने आंदोलक कर्मचार्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचारी व सुरक्षारक्षकांनी अतिशय विपरीत परिस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांच्या नेतृत्वात नागपूर अधिवेशनावर धडक देऊन आपली व्यथा मांडली. उच्च तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी दिलेल्या ओशासनाने कर्मचार्यांना दिलासा मिळाल्याचे बा. दे. अभियांत्रिकी शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र काशीकर यांनी कळवले आहे.