वर्धा जिल्ह्यातील ग्रापंला १० कोटी ७९ लाख

वर्धा/प्रतिनिधी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना १५ व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अबंधित निधीच्या पहिल्या हप्त्याचे वितरण केंद्र सरकारने केले असुन वर्धा जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतमध्ये अनुक्रमे १०:१०:८० या प्रमाणात निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली. वर्धा जिल्हातील वर्धा पंचायत समिती अंतर्गत ७६ ग्रापंला २ कोटी ९५ लाख १ हजार, सेलू पंस अंतर्गत ६२ ग्रापंला १ कोटी २० लाख ८१ हजार, देवळी पंस अंतर्गत ६१ ग्रापंला १ कोटी २३ लाख ६६ हजार, आर्वी पंस अंतर्गत ६४ ग्रापं १ कोटी १२ लाख ८१ हजार, आष्टी पंस अंतर्गत ४१ ग्रापंला ७६ लाख२६ हजार, कारंजा पंस अंतर्गत ५९ ग्रापंला ९० लाख ८५ हजार, हिंगणघाट पंस अंतर्गत ७६ ग्रापंला १ कोटी ४२ लाख ३२ हजार, समुद्रपूर पंस अंतर्गत ७१ ग्रापंला १ कोटी १७ लाख ९७ हजार असे वर्धा जिल्ह्याला १० कोटी ७९ लाख ७९ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. चझ ठरावरी ढरवरी यामध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यामध्ये अनुक्रमे १०:१०:८० या प्रमाणात निधी वितरीत करण्यात आला असुन राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने १३ डिसेंबर रोजी शासन निर्णय निर्गमीत करुन केंद्र सरकारच्या निधी वितरण १ डिसेंबर २०२३ च्या आदेशावर कार्यवाही केली आहे. वितरीत करण्यात आलेला सर्व निधी थेट जिल्हापरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या खात्यामध्ये हस्तातरीत करण्यात येणार असल्याचे शासन निर्णय नमुद करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी सुद्धा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेला १५ व्या केंद्रीय वित आयोग अंतर्गत निधी प्राप्त झालेला असुन आज केंद्र सरकारने ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करून दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेला प्राप्त निधीमुळे ग्रामीण भागातील रस्ते तसेच अन्य विकासकामांना गती मिळणार असुन १५ व्या वित आयोगांतर्गत विकास कामे प्राधान्याने पुर्ण करण्यात येणार असल्याचे खासदार रामदास तडस म्हणाले.