मराठी पत्रकार परिषद आदर्श पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा

आर्वी/प्रतिनिधी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांची ३ डिसेंबर२०२३ रोजी एस. एम. देशमुख यांनी घोषणा केली प्रत्येक महसूल विभागातून एक याप्रमाणे राज्यातील आठ तालुका पत्रकार संघ या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.

नागपूर विभागात आर्वी तालुका पत्रकार संघटना आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराचा मानकरी ठरली आहे मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न राज्यातील अनेक जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ आपआपल्या कार्यक्षेत्रातसामाजिक बांधिलकी जपत कार्य करीत असतात. तसेच मराठी पत्रकार परिषदेचे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवत असताना आर्वी तालुका पत्रकार संघटना दहावी व बारावी परीक्षेमध्ये गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, अपंग व गरजू व्यक्तींर्ना तीन चाकी रिक्षावाटप, आर्वी शहरातील विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवरांचा सत्कार, पत्रकार दिनानिमित्त रुग्णांना फळ वाटप असे अनेक उपक्रम नेहमी राबवित असते तसेच पर्यावरण, आरोग्य,शिक्षण व सामाजिक क्षेत्रात जनजागृती करण्याकरता नेहमी अग्रेसर राहते कोरोना काळामध्ये रुग्णांना तसेच प्रशासनांना आवश्यक त्या प्रकारची मदत सुद्धा संघटनेने त्या काळात मोठ्या प्रमाणावर केली संघटनेच्या कार्याची दखल घेऊनच आर्वी तालुका पत्रकार संघटनेला हा पुरस्कार घोषित करण्यात आला. नागपूर विभागातून आर्वी तालुका पत्रकार संघटना लातूर विभागातून माहूर तालुका पत्रकार संघ,नाशिक विभागातून साकी तालुका पत्रकार संघ, पुणे विभागातून शिरूर तालुका पत्रकार संघ, अमरावती विभागातून तेल्हारा पत्रकार संघ, कोल्हापूर विभागातून शिराळा तालुका पत्रकार संघ, कोकण विभागातून अंबरनाथ तालुका पत्रकार संघ हे पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.

मराठी पत्रकार परिषद आदर्श पत्रकार पुरस्कार सोहळा दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी श्रीक्षेत्र माहूर जिल्हा नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. मराठी पत्रकार परिषद संघटनेचे अध्यक्ष एस एम देशमुख, जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील. जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड. गडचिरोली जिल्हाध्यक्ष अविनाश भांडेकर. महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर यांचे आर्वी तालुका पत्रकार संघटनेचे अनिल जोशी डॉ शामसुंदर भूतडा,विजय अजमीरे, सूर्यप्रकाश भट्टड, अभय दर्भे,सुशील सिंह ठाकूर,संजय पाटणी, उदय बाजपेयी, गौरव कुऱ्हेकर, सतीश शिरभाते, पुरुषोत्तम नागपुरे, संदीप जैन, प्रमोद डोळस, विजय झेंडे, सचिन पाटणी, अरविंद लिलोरे, सुनील पारसे, पराग ढोबळे यांनी आभार मानले. आर्वी तालुका पत्रकार संघटनेला पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आमदार दादारावजी केचे, माननीय उपमुख्यमंत्री यांचे स्वीय सचिव सुमित वानखेडे, माजी आमदार अमर काळे, भारत राष्ट्र समिती जिल्हा समन्वयक जयदादा बेलखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप काळे आदींनी अभिनंदन केले.