जनता-जर्नादनाला नमन, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निवडणुकीवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

नवी दिल्ली/प्रतिनिधी राजस्था, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की जनता-जनार्दनाला नमन!. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीच्या निकालांनी दाखवून दिले की भारताच्या जनतेचा विेशास केवळ आणि केवळ सुशासन आणि विकासाच्या राजकारणात आहे. त्यांचा विेशास भाजपवर आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजपवर आपला स्नेह, विेशास आणि आशीर्वाद बरसण्यासाठी या सर्व राज्यांच्या कुटुंबियांचे खासकरून माता-भगिनी-मुलींचे, आमच्या तरूण मतदारांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना विेशास देतो की आम्ही तुमच्या कल्याणासाठी निरंतर अथक परिश्रम करत राहू. या निमित्ताने पक्षाच्या सर्व परिश्रमी कार्यकर्त्यांचे विशेष आभार! तुम्ही सर्वांनी अद्भुत उदाहरण सादर केले आहे. भाजपचा विकास आणि गरीब कल्याणकारी योजना ज्या पद्धतीने लोकांमध्ये पोहोचवल्या त्याचे कौतुक जितके केले जावे कमी. आम्ही विकसित भारताचे लक्ष्य घेऊन पुढे जात आहोत. आम्हाला थांबायचे नाहीये. तसेच थकायचेही नाही. आम्हाला भारताला विजयी बनवायचे आहे. आज या दिशेने आम्ही पुन्हा एकदा सशक्त पाऊल उचलले आहे.