संविधानामुळे आपला देश एकसंघ- खासदार रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहले कि, त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो, ते म्हणजे भारतीय संविधान, कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही. भारतातील विविध धर्म आणि जातींच्या १४० कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. राज्यघटनेतच देशाची तत्त्वे आणि ती चालवण्याच्या पद्धती आहेत. संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत, राज्यघटनेने दिलेले मुलभूत अधिकार हे आपली ढाल म्हणून काम करून आपल्याला हक्क बहाल करत असले. तर, त्यात दिलेली मुलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदा-यांची आठवण करून देतात.

या संविधान दिनी आपण आपली मूलभूत कर्तव्ये आणि देशाचे कायदे आयुष्यभर पाळण्याची शपथ घेतली पाहिजे. तेव्हाच देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनल्याने संविधानाचा उद्देश तर पूर्ण होईल, संविधानामुळे आपला देश एकसंघ असल्याचेे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती, चिंचाळा द्वारा आयोजित संविधान दिवस व ग्रंथ समापन दिवस उद्घाटन प्रसंगी बोलत होते. चिंचाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती, चिंचाळा द्वारा आयोजित संविधान दिवस व ग्रंथ समापन दिवस कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळी-पुलगांव विधानसभा निवडणुक प्रमुख राजेश बकाने हे होत तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ठाणेदार पोलिस स्टेशन देवळी भानुदास पिदुरकर, प्रमुख उपस्थिती म्हणुन जिल्हा सचिव, भाजपा दशरथ भुजाडे, सामाजिक कार्यकर्ता प्रविण आगलावे, सरपंच चिंचाळा सौ. प्रतिभा हेमंतराव डुकरे, सामाजिक कार्यकर्ता चंद्रशेखर दिक्षीत, माजी सभापती पं.स.देवळी सौ. विद्या भुजाडे, आरपीआय अ गट नेता मारोतराव लोहवे, फाऊंडर वर्धा मर्चन्ट बँक सौ. समता शंभरकर, सामाजिक कार्यकर्ता, विजय हातमोडे, दिपक गावंडे दिघी उपस्थित होते.

यावेळी राजेश बकाने, ठाणेदार भानुदास पिदुरकर, सौ. विद्या भुजाडे, मारोतराव लोहवे यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्राचे फुले-शाहू आंबेडकरी गितांचा बुलंद लॉर्ड बुध्दा टिव्ही आवाज युट्युब सिंगर राष्ट्रीय प्रबोधनकार, नागपुर सुप्रसिध्द गायक भिमेश भारती महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायिका टि.व्ही, सि.डी. सिंगर पुण ेरानी तबस्सुम यांचा धम्म प्रबोधनात्मक व बुध्द-भिम गिंताचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आयोजक समितीचे संभव इंगोले, तुषार दिक्षीत, सुजित बोधी, कुणाल महेशगौरी, अमर डुकरे, संदिप भुजाडे, प्रविण तेलतुंबडे, सुमेध शंभरकर, प्रफुल थुल, राजेंद्र डुकरे, भिमराव अलोणे, समोर भुजाडे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला सम्यक अलोणे, अतुल डुकरे, श्रेयस भुजाडे, मनोज डुकरे, आशिष डुकरे, सुरज वेले, अमित तेलतुंबडे, सुनिल डुकरे, धर्मवीर कांबळे, शांतारक्षक फुलमाळी, साहील डुकरे, भिमराज तेलतुंबडे, रंजित डुकरे, हर्षल हेमंत डुकरे, स्वप्निल वाघमारे, नितीन भांडुले, सचिन मरतोडे, प्रतिक डुकरे, सम्यक डुकरे, कुणाल डुकरे, मयुर डुकरे, रविंद्रा फुलमाळी, राकेश डुकरे, दिनेश पुनवटकर, अमित डुकरे, रॉयल फुलकर, अमोल डुकरे, निखील डुकरे, नरेंद्र दिक्षीत, विजय मुन, प्रथमेश डुकरे, आर्यन डुकरे, सुभाष टुकरे, मिलींद डुकरे, हार्दिक डुकरे, हिमांशु डबले, अक्षय ज. डुकरे, अक्षय प्र. डुकरे, अक्षय प्रे. डुकरे, नरेश सं. डुकरे, संदिप डुकरे, नितीन डुकरे, प्रफुल डुकरे, धर्मपाल तितरे, प्रविण तितरे, प्रक्षिक फुलमाळी, बहल डुकरे, विजय डुकरे, विजय त्र्यं, डुकरे, वसंता डुकरे, आनंद डुकरे, संघपाल बोधी, अंकीत डुकरे, गिरोली राष्ट्रपाल कांबळे, राहुल पाटील, सुहास हस्ते, शैलेंद्र थुल व मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.