माणूस घडविण्याचे कार्य शाखेमार्फत- उमेश पिंपळकर

आर्वी/प्रतिनिधी भारतीय समाजाच्या मानसिकतेचा अभ्यास करून १९२५ मध्ये संघाची स्थापना करण्यात आली. समाज मनाला बांधणारी यंत्रणा असावी, माणूस घडला पाहिजे माणूस उभा झाला तर देश उभा होतो. स्वतःबरोबर इतरांचा विचार करणारा शेकडो वर्षाचा विचार करणारा, नियम पाळणारा, अधिकाराबरोबर कर्तव्य ओळखणारा, भारतीय संस्कृतीची जाण असणारा माणूस घडविण्याचे कार्य शाखेमार्फत सुरू केले, असे प्रतिपादन उमेश पिंपळकर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा आर्वीच्या विजयादशमी उत्सवात निमित्त श्रीराम प्राथमिक शाळेच्या मैदानावर शनिवार २८ रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून वर्धा येथील संत विनोबा भावे सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. प्रसन्नकुमार बंब होते तर व्यासपीठावर तालुका संघ चालक रमेश नागोसे उपस्थित होते. पिंपळकर पुढे म्हणाले की संघाचे कार्य निसर्ग व संस्कृतीला अनुसरून असल्यामुळे संघाच्या रचनेमध्ये हिंदू संस्कृतीची छाप असते.

विजयादशमीला पौराणिक व इतिहासाची जोड आहे. भारताचे आराध्य दैवत श्री रामचंद्र यांनी याच दिवशी रावणावर विजय मिळवला हा दिवस धर्माचा अधर्मावर एक विजय असल्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विजयादशमी उत्सव तळक्षरूरवरीराळ साजरा करतो. सातत्याने एखादी गोष्ट करणारी यंत्रणा समाजाला देण्याकरता शाखा सुरू करण्यात आल्या असून शाखेच्या माध्यमातून हिंदू संस्कृतीचा विचार राष्ट्रीय विचाराचं कार्य हाती घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले. भारत हा विेशाचा विचार करणारा देश आहे. अनुकूल परिस्थिती असली तरी अनेक नवीन आव्हाने भारताने स्वीकारलेली आहे. हमास प्रवृती जगाची प्रमुख समस्या असल्यामुळे अशा अधर्मी प्रवृत्तीला धर्माच्या आचरनाने नष्ट करण्याची गरज आहे, असेही पिंपळकर म्हणाले. प्रसन्नकुमार बंब यांनी संतांचा आचार व विचार समाजाकरता असतो. कोहम ते सोहम पर्यंत प्रवास म्हणजे अध्यात्म, जन्म व मृत्यूपर्यंतचे अंतर म्हणजे अध्यात्म आहे. समाजात रक्तपिसासू लोकांची गरज नसून समाजाला सद्गुगुणाची व सत्कर्माची साथ असल्यास समाजाचा समाजातील दुःखाचा व समस्येचा अंत होऊ शकतो असे सांगितले. पाहुण्यांचा परिचय व आभार हर्षल देशमुख यांनी मानले. सुभाषित शुभम गीते, अमृत वचन प्रणित लोखंडे तर वैयक्तिक गीत हरीश तांबोळी यांनी सादर केले. स्वयंसेवकांनी कवायती सादर केल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने स्वयंसेवक, गणमान्य व्यक्ती, नागरिक पुरुष व महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमापूर्वी नगरातील प्रमुख मार्गाने पथसंचालन काढण्यात आले.