मराठवाड्यात आंदोलन पेटलं! जालन्यात तहसीलदाराची गाडी फोडली; संभाजीनगर हिंगोली,परभणी, नांदेड लातूर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन मराठवाड्यात तापताना पाहायला मिळत आहे. जालना यथे े महिला तहसीलदाराची गाडी फोडण्यात आली आहे. तर, नांदेड आणि बीड जिल्ह्यात एसटी बसवर दगडफेक करण्यात आल्याने वातावरण तापले आहे. या सर्व पोर्शभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व एसटी सेवा रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूर या चारही जिल्ह्यातील बस सेवा देखील बंद करण्यात आली आहे. या चार जिल्ह्यात एकूण ३० आगर असून, अंदाजे २८०० पेक्षा अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचा परिवहन विभागाला फटका बसतांना पाहायला मिळत आहे. नांदेड, हिंगोली,प रभणी आणि लातूर जिल्ह्यातील बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे आयजी महावरकर आणि हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या सुचनेनुसार एसटी विभागाने बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परभणी आणि हिंगोली दोन जिल्ह्यातील एकूण ७ आगारातील ३८० बसेचच्या २८०० फेऱ्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास ३५० बससे जागवे र उभ्या आहते . तसचे , आज सायंकाळी पाच वाजेनंतर उद्या बस सुरु करायच्या की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे