समकालीन व्यवस्थेत समाजाभिमुख संशोधनाची आवश्यकता- प्रा. डॉ. धनंजय सोनटक्के

सेलू /प्रतिनिधी समकालीन व्यवस्थेत समाजात अनेक समस्या आहेत. समाजातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, कायदा, शैक्षणिक, मानसिक, शारीरिक, आरोग्य आदी क्षेत्रातील विविध प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी संशोधकांनी शास्त्रीय व वस्तुनिष्ठ संशोधन करणे अभिप्रेत आहे. समकालीन व्यवस्थेत समाजाभिमुख संशोधनाची आवशकता आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. धनंजय सोनटक्के यांनी केले. ते यशवंत महाविद्यालय सेलू येथील संशोधन केंद्र आणि रुटस फाउंडेशन फॉर बिहेविअरल सायन्सेस, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संशोधन पद्धती या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणुन यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धाचे उपाध्यक्ष श्री सतिशराव राऊत होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय वर्धा येथील डॉ. गणेश गाडेकर यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी कार्यकारी प्राचार्य डॉ. संदीप काळे यांनी स्वागतपर विचार व्यक्त केले. प्रास्ताविक कार्यशाळेचे संयोजक डॉ. अनंत रिंर्ढे यांनी केले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. अजर्ुन खोब्रागडे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. रश्मी बकाने यांनी केले. कार्यशाळेतील प्रथम व द्वितीय तांत्रिक सत्रात डॉ. गणेश गाडेकर यांनी संशोधन पद्धतीचा अवलंब करताना शास्त्रीय संशोधन पद्धतीमधील तांत्रिक बाबी, सांख्यिकिय पद्धतीचा उपयोग, विविध अनुमापन तंत्रे यासंदर्भात अतिशय अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. तसेच अनेक संशोधकांनी त्यांना विविध प्रश्न विचारून स्वतःच्या शंकाचे निरसन करून घेतले. अर्थात संशोधकांनी याप्रसंगी संशोधन पद्धतीविषयी दुहेरी पद्धतीने सुसंवाद साधला. प्रथम सत्राचे सूत्रसंचालन डॉ. नंदा इंगळे तर द्वितीय सत्राचे सूत्रसंचालन प्रा. किशोर हुमने यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. विजय खोरगडे यांनी केले.

समारोपीय समारंभात प्रमुख अतिथी म्हणून. डॉ. सुमेधा वानखेडे व शुभांगी सिंग उपस्थित होत्या. त्यांनी संशोधकांना यथोचित मार्गदर्शन केले. तर अध्यक्ष म्हणुन डॉ. संदीप काळे होते. यावेळी संशोधकांचे प्रतिनिधी म्हणुन प्रा. राजेंद्र कटरे व प्रणिता गुल्हाने यांनी विचार व्यक्त केले. समारोपीय समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. रश्मी बकाने यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. अनंत रिंर्ढे यांनी केले. प्रस्तुत कार्यशाळेस संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण एकावन्न संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. सोनाली ठाकरे, प्रा. स्मिता बुरडे, प्रा. विद्याश्री हिंगे, प्रा. प्रणिता चाफले, श्री प्रफुल्ल बुटे, श्री बाबुराव सोनोने, तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी यांनी परिश्रम घेतले.