शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?

शर्डी/प्रतिनिधी “२०१४ च्या आधी महाराष्ट्रातील एक नेते अनेक वेळा राज्याचे कृषिमंत्री राहून गेले. मात्र त्या काळात शेतकऱ्यांचे मोठे हाल होते. शेतकऱ्यांसाठी कुठलीच योजना काम करत नव्हती. शेतकऱ्यांना अनेकदा हेलपाटी मारावे लागत होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नाव फक्त राजकारणासाठी वापरले गेलं मात्र २०१४ नंतर हे चित्र बदललं. आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम के ल,ं असे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगरच्या शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी शिर्डीजवळील काकडी गावात सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर अजित पवार त्यांच्यासमोरच टीका केल्याचे दिसून आले.

मोदी म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम करत होते व्यक्तिगतरीत्या मी त्यांचा सन्मान करतो मात्र सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपी वर धान्य खरेदी केले परंतु आपल्या सरकारने सात वर्षात साडेतीन लाख कोटी रुपयाच्या एमएसपीवर धान्य खरेदी केल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरवात मराठीतून करत शिर्डीच्या या पावन भूमीला माझे कोटी कोटी नमन’ भाषणाला सुरवात केली. मोदी यावेळी म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी या पवित्र मंदिराला शंभर वर्ष पूर्ण झाले होते, त्यावेळी मला दर्शनाची संधी मिळाली होती. यावेळी सुरवातीलाच त्यांनी कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना आदरांजली देखील वाहिली. ते म्हणाले की, आज सकाळी देशाचं अनमोल रत्न, वारकरी संप्रदायाचं वैभव बाबामहाराज सातारकर यांचं निधन झालं. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ज्यांनी जगाला मार्गदर्शन केलं, त्यांच्या सहज वाणीतुन निघणाऱ्या ‘जय जय रामकृष्ण हरि’ने एक वेगळाच आनंद मिळत होता. मात्र आज त्यांचे देहावसान झाले, त्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली!’