नकारात्मक विचार व वृत्तीचा नाश करण्यासाठी या सणाचे महत्व- खासदार रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी देवळी शहरात प्रत्येक जाती धर्माचे सण उत्सव एकत्र येवुन साजरे करण्याची एक चांगली व स्तुत्य प्रथा आहे, दसरा हा वाईट विचारांचा दुर करण्याचा सण आहे, या विजया दशमीच्या मुहूर्तावर सकारात्मक विचारांची संजिवनी घेऊन नकारात्मक विचार व वृत्तीचा नाश करावा, केन्द्रातील सरकार रामराज्याची संकल्पना कार्यान्वीत करण्यासाठी अनेक योजना अमलात आणल्या आहे, विेशकर्मा व इतर लोकोपोयोगी योजनेतुन सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे कार्य करीत आहे, महिलांसाठी अनेक योजना राबबिण्यात येते आहे, यातील एक महत्वपुर्ण निर्णय म्हणजे लोकसभा व विधानसभा करिता महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे, महाराष्ट्र सरकारने देशाचे लोकप्रीय पंतप्रधान श्री. नरेन्द्रजी मोदी यांचया जन्मदिवसाच्या औचीत्य साधुन नमो शहर सौदर्यीकरण योजनेतुन देवळी शहराची निवड करण्यात आली असुन सोबतच या आधी देवळी मध्ये करोडो रुपयाचे स्टेडीयम, नाटयगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे, अमृत २.० पाणीपुरवठा २० कोटी देवळी शहर अंतर्गत पाईपलाईनचे काम मंजुर झाले आहे, असे प्रतिपादन यावेळी खासदार रामदास तडस केले. मिरननाथ यात्रा मैदान देवळी येथे विजयादशमी उत्सव समिती देवळी व्दारा आयोजीत भव्य दसरा मेळावा खासदार रामदास तडस यांच्या उपस्थिीती संपन्न झाला.

यावेळी राजेश बकाने, पोलीस निरीक्षक भानुदास पिदुडकर, माजी नगराध्यक्ष सौ. शोभा रामदास तडस, प्रकाश कारोटकर, शरद आदमने, मारोतराव मरघाडे, राहुल चोपडा, उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक भानुदास पिदुडकर, राजेश बकाने, माजी उपाध्यक्ष डॉ. नरेन्द्र मदनकर यांनी समोयोचीत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक नंदकिशोर वैद्य व संचालन रवी कारोटकर यांनी केले, आभार नरेन्द्र मदनकर यांनी मानले. कार्यक्रमाला विजय गोमासे, दिलीप कारोटकर, डॉ. श्रावण साखरकर, दिवाकर झाडे, रितेश लोखंडे, ताराचंद गुजरकर, सारिका लाकडे, संदीप पिंपळकर, दिलीप खाडे, अंकित टेकाडे, सौरभ कडु व देवळीकर नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.