माता भक्तांच्या आठ दिवसाच्या जागराचा भाजपाने केला सत्कार

वर्धा/प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीची नवीन कार्यकारिणी अजून जोमाने कामाला लागल्याचे नवमीच्या दिवशी स्पष्ट झाले. दुर्गोत्सवात आठ दिवस देवीचा जागर करून शहर दणाणून सोडणार्या आई भक्तांचा दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत सोमवार २३ रोजी सत्कार करण्यात आला. या अभिनव उपक्रमाची शहरात चांगलीच चर्चा रंगली. भाजपा वर्धा शहर अध्यक्ष निलेश पोहेकर यांच्या नेतृत्वात राधे कॉम्प्लेक्स परिसरात आयोजित कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आमदार डॉ. पंकज भोयर, विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदिरा मार्केट ते सोशालिस्ट चौक या रस्त्यावर येणार्या विसर्जन मिरवणुकांचे स्वागत करून पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. नवरात्रीचा उत्सव शहरात धूमधडाक्यात साजरा केला जातो. डोळ्याचे पारणे फेडणारा हा उत्सव अनुभवण्यासाठी नवमीच्या दिवशी जिल्ह्यातून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी भक्त वर्धेत येतात.

९ दिवस भक्तीभावाने अनेक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवत नवरात्रीचा हा उत्सव दिवसरात्र मेहनत करून साजरा करण्यात येतो. मंडळाचे बहुतेक पदाधिकारी संपूर्ण ९ दिवस उत्सव साजरा करण्यासाठी परिश्रम घेत असल्याने भाजपाच्या वतीने आयोजकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा महामंत्री अविनाश देव, गुंड्डू कावळे, अर्चना वानखडे, श्रीधर देशमुख, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशार्ली येरावार, शीतल डोंगरे, वीरू पांडे, अभय नगरे, जगदीश टावरी, प्रमोद मुरारका, मनोज भुतडा, प्रवीण चोरे, ॲड. महेश धाये, जयंत येरावार, नौशाद शेख, शरद आडे, श्रेया देशमुख उपस्थित होते. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थानचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्युदय मेघे यांनीही भेट दिली. यशस्वतीसाठी प्रशांत झलके, मुकेश धुरई, कन्हया चैनानी, तुळशीराम पोटदुखे, अभिषेक त्रिवेदी, मंगेश मांगलेकर, अनिल धोटे, प्रवीण मोहाडकर, अमोल कांबळे, सौरभ देशमुख, दिनेश डकरे यांनी परिश्रम घेतले. संचालन अनिता ढोबळे यांनी केले.