न्यायपूर्ण समाजरचनेसाठी महिलांनी बोलले पाहिजे- प्रेरणा देसाइ

सेवाग्राम/प्रतिनिधी गांधी प्रतिष्ठान दिल्ली, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, विदर्भ भूदान ग्रामदन सहयोग व राष्ट्रीय युवा सघटनच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय महिला परिसंवाद, सेवाग्राम येथील यात्री निवास येथे पार पडला. या परिसंवादा करिता महाराष्ट्रातील १२ जिल्हे तसेच गुजरात, मध्यप्रदेश येथून शंभरच्या वर महिला उपस्थित होत्या. परिसंवादाचे उद्घाटन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आशाताई बोथरा यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय युवा संघटनच्या राष्ट्रीय समन्वयक प्रेरणा देसाई उपस्थित होत्या. सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली आशाताई बोथरा उद्घाटनपर भाषणात म्हणल्या की आज आधुनिक काळात महिला बुद्धिमत्तेच्या भरवश्यावर वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांच्या कतर्ुत्वचा ठसा उमटवीत आहेत परंतु तरीही त्या सुरक्षित नाही, मणिपूरच्या घटनेने याचा पुन्हा प्रत्यय आला. आपण पुढे जात आहोत की मागे, प्रेम आणि करुणा या स्त्रियांची नैसर्गिक भावना आहे, आपले हे गुण कायम ठेवून एका चांगल्या जगाची निर्मिती कशी करता येईल याचा विचार स्त्रीने केला पाहिजे.

स्त्रियांची अर्धी दुनिया ही पूर्ण दुनियेला जन्म तर देते पण त्यांच्यावर योग्य संस्कार करून न्यायपूर्ण समाजवादी समाज रचना निर्माण करू शकत नाही हो खेदाची बाब आहे, हा परिसंवाद मात्र आशेचा किरण ठरेल असे म्हणत भूदान चळवळीत व स्वातंत्र्य आंदोलनात स्त्रियांची भूमिका यावर प्रकाश टाकला. सूत्र संचालन प्र. अर्चना लोडे यांनी केले. परिसंवादामद्धे वेगवेगळ्या विषयांवर विचार मंथन झाले. संवादाच्या पहिल्या सत्रात प्रेरणा देसाई मुंबई यांनी देशाची वर्तमान स्थिति या विषयावर चर्चा घडवून आणली . त्या म्हणल्या की देशाची वर्तमान स्थिति ही समजाच्या खालच्या घटकाला न्याय देणारी मुळीच नाही पुरुषांनी त्यांच्या सोयीने निर्माण केलेल्या या जगत स्त्रियांना न्याय मिळणे शक्य नाही. बळी तो कानपिळी अशी स्थिती निर्माण झालेली आहे व ही बदलली पाहिजे या विषयाला अनुसरून महिलांनी मते मांडली. संचालन शारुबी हिने केले.

यानंतर सुषमा शर्मा यांनी समाज परिवर्तनात महिलांची भूमिका या विषयावर वक्तव्य करताना म्हणल्या कि स्त्रियांशिवाय जसे हे जग अपूर्ण आहे तसेच पुरुषांशिवाय देखील ते अपूर्णच आहे म्हणून सहजीवनाने बर्याच समस्या सुटू शकतात जगण्याचा हा सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे तरच परिवर्तन शक्य आहे, यावर महिलांनी चर्चा झाली. सातरचे संचालन सुचिता इंगोले यांनी केले. प्रा. नूतन माळवी यांनी नेतृत्व म्हणजे काय? महिला कुठे कमी पडतात? व का? यासाठी लोकतंत्रिक नेतृत्वाची गरज कशी आहे, पुरुष प्रधान संस्कृती मध्ये महिलांचे नेतृत्व महत्वाचे आहे, त्यासाठी माहीलामध्ये निर्णय क्षमता विकसित व्हाळा हवी, अनेक ठिकाणी महिला पदावर असतात पण निर्णय पुरुष घेतात हे चित्र बदलले पाहिजे या विषयावर संवाद साधला सूत्रसंचलन सानिका नेवारे हिने केले. महिला संवादाच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रांमध्ये सुरुवातीला डॉ. प्रा. सुचिता ठाकरे यांनी सांस्कृतिक धार्मिक ऐकण्यासाठी महिलांची भूमिका या विषयावर संवाद साधला.

महिलांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवण्यासाठी मोठी लढाई लढावी लागली आहे, संविधानाने माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळाला यात धर्मस्वातंत्र्याचा उपयोग सदसदविवेक बुद्धीने वापरण्याचे स्वातंत्र्य आहे, धर्म ही आपली वैयक्तिक बाब आहे मात्र आज देशांमध्ये धर्मांधता पसरवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहे म्हणूनच महिलांनी या धार्मिक आणि सांस्कृतिक ऐक्यासाठी प्रयत्नशील असावे या आशयाची चर्चा झाली. संचालन रेशमा यांनी केले. यानंतर आर्थिक क्षेत्रात महिलांचे नेतृत्व या विषयावर प्रेरणा देसाई यांनी मत मांडले त्या म्हणाले की लोकांपासून पैसा एकत्रित करून आपण बँकांमध्ये टाकतो आणि बँक आता पैसा एखाद्या उद्योगपतीला वापरण्यासाठी देतात, उद्योगपती तो पैसा वापरून भरपूर पैसे कमावतो या प्रक्रियेमध्ये माणसाची मात्र कोणतीच उन्नती होत नाही म्हणूनच गावातील पैसा हा गावातच वापरला गेला पाहिजे, जेथे निर्मिती तिथेच त्या वस्तूंचा खप झाला पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. सत्राचे संचालन प्रतीक्षा यांनी केले.

दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रामध्ये ऍड. पूजा जाधव यांनी राजकारणासाठी महिला नेतृत्व व त्यांचा दृष्टिकोन या विषयावर विषय प्रवेश करून समाज घडवून आणला महिला राजकारणात येऊ पाहत नाही राजकारण हा आपला पिंड नाही असं जणू त्यांना वाटते परंतु आपलं जीवन राजकारणविहीन असूच शकत नाही म्हणूनच हे राजकारण अधिक चांगलं कसं करू शकतो यावरती महिलांनी विचार केला पाहिजे असे त्यांना मत त्यांनी व्यक्त केले, सूत्र संचालन द्वारका ताई यांनी केले. दोन दिवस या महिला संवादाचा समारोप चर्चासत्राने झाला आता आपण इथून गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये काय कोणती कार्यनीती आपली पाहिजे यासाठी चर्चा झाली कार्यक्रमाचा समारोप प्रेरणात देसाई व आशाताई बोथरा यांच्या उपस्थितीत झाला. या जगाला या देशाला कसा आणखीन उत्तम बनवता येईल यावर आपण दोन दिवस विचार मंथन केले व हीच मिळालेली दिशा आपण पुढे नेऊया उत्तम समाज घडवूया असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी यामिनी गजपुरे, प्रशांत नागोसे, मनोज ठाकरे, भालचंद्र लोडे, सानिका नेवारे, शारुबी, द्वारका ताई, रेशमा, प्रतीक्षा, मालती व राष्ट्रीय युवा संघटनेचे अनेक साथी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी १०५ महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन यामिनी गजपुरे यांनी केले.