मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास आपले सरकार कोसळेलव

प्रतिनिधी जालना तालुक्यातील अंतरगांव सराटी येथे मराठा बांधवाचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु होते. परंतु मंत्र्यांच्या आदेशानंतर अमानुषपणे आंदोलनकर्त्यांवर पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज करुन गोळीबार केला. त्यात बरेच मराठा बांधव, महिला भगिणी, मुले मार लागुन धारातिर्थी पडले. या अमानुष अत्याचाराला शासनकर्ते च जबाबदार असून शिंदे सरकारने राजीनामा दयावा असे विचार कृषिसेनेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव कोकाटे यांनी शिवाजी महाराज चौकातील मराठा बांधवांच्या आंदोलनाला पाठींबा देतांना व्यक्त केले.

त्याला क्षत्रिय मराठा समाज संस्थेचे सदस्य सुभाष पाटणकर, राजेश वाकडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष अरुण जगताप, कार्याध्यक्ष प्रा. उमाकांत डुकरे, राजेंद्र यादव, संदिप भांडवलकर यांनी आपल्या भाषणातून झालेल्या कृत्यावर जोरदार निषेध केला. यावेळेस एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवराय, माँ जिजाऊंप्रती आदर व्यक्त करुन घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात अमोल वाघ, सचिन खंडारे, क्षत्रिय मराठा समाज संघटनचे सदस्य प्रा. राजेंद्र जाधव, मार्गदर्शक डॉ. के. पी. निंबाळकर, अर्चित पंडीतराव निघडे, स्वप्निल ताटे, मंगेश चांदुरकर, डॉ. रतनलाल सोळंकी, प्रदीप राहाटे, राजेंद्र यादव, संदिप श्रीधर गोडसे, प्रदीप मचाले व इतर मराठा बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. २ दिवसात आरक्षण न मिळाल्यास वर्धा शहर बंद करुन मोर्चा काढणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केले.