देशातल्या सर्व निवडणुका एकाच वेळी होणार? मोदी सरकारचा मोठा निर्णय; माजी राष्ट्रपतींवर सोपवली मोठी जबाबदारी!

नवी दिल्ली/प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपासून देशात सर्व निवडणुका एकत्र घेण्यासंदर्भात चर्चा होत असल्याचं दिसून आलं आहे. “एक देश, एक निवडणूक’ या मुद्द्याचं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने समर्थन करताना दिसले आहेत. त्यामुळे यासंदर्भात अनेक पातळ्यांवर चर्चा होत होती. मात्र, आता केंद्र सरकारने यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एक देश, एक निवडणूक ही चर्चा वास्तवात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात एकीकडे विरोधक केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका करत असले, तरी केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्याचं पाहायला मिळत आहे.