आष्टीच्या क्रांतिस्थळाला स्फूर्तिस्थळाचा दर्जा मिळून देणार- खासदार तडस

तळेगाव (श्या.पंत)/प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या लढ्यात आष्टीचे मोठे योगदान आहे. येथे असलेल्या ब्रिटीशांच्या पोलिस चौकीवर तिरंगा फडकवण्यात आला. तो इतिहास जनतेपुढे जायला हवा. नवीन पिढीला इतिहास माहिती व्हावा यासाठी येथे स्मृतीस्थळ निर्माण करण्याची मागणी शहीद स्मृती स्मारकाची होती. ती मागणी आता सुमीत वानखेडे, आ. दादाराव केचे यांच्या पाठपुराव्याने पुर्ण होणार आहे. या स्मृती स्थळाला १५० कोटी रुपयाचा भरीव निधी मंजूर झाला असुन जिल्हा नियोजन समिती क्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात येईल, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने २१ (नागपंचमी) रोजी आयोजित ऑगस्ट क्रांतीदिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अरविंद मालपे होते तर विशेष अतिथी म्हणून आ. दादाराव केचे, उपमख्ु यमत्रं ी फडणवीस याचं े विशषे कार्य अधिकारी सुमित वानखडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलिस अधीक्षक नुरुल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, संचालक महाऑरेंज श्रीधर ठाकरे, विनायक पारे, भरत वंजारा, माजी सैनिक बनासुरे व्यासपीठावर उपस्थित होते.

आ. दादाराव केचे यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहत या ठिकाणी घडलेल्या क्रांतीचे महत्त्व विषद केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आष्टीच्या विकासासाठी प्रशासन मदत करेल, असे सांगितेल. पोलिस अधीक्षक नुरूल हसन, मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांनी शहिदांना श्रद्धांजली वहिली. सुमित वानखडे यांनी अभ्यासपुर्ण आष्टीच्या लढ्यावर प्रकाश टाकताना आष्टीचा लढा देशातील सर्वसमावेशक एकमेव लढा होता. समाजातल्या प्रत्येक स्तरातील व्यक्तीने सर्वोच्च बलिदान या लढ्यासाठी दिले. या त्यागाचा गौरव होणे आवश्यक आहे आणि शहीदांच्या स्मृती भविष्यात निरंतर जागल्या गेल्या पाहिजे, त्यासाठी आपल्या सर्वांना काम करावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. अरविंद मालपे यांनी आष्टीच्या इतिहासावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक भरत वंजारा यांनी केले. संचालन वीरेंद्र कडू यांनी केेले तर आभार शितल चोरे यांनी मानले. याप्रसंगी हुतात्मा स्मारक समितीचे तथा हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.