देवळीतील कायदा व सुव्यवस्थेसाठी ठाणेदार राणे यांचे कार्य राहिले- खा. रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी पोलीस निरीक्षक तिरूपती राणे यांनी देवळीतील अडीच वर्षाच्या कार्यकाळात आपली कार्यतत्परता सिद्ध केली. कोरोना महामारीतील त्यांचे परिश्रम धाडस बांधणारे होते. तसेच त्यांनी सेवा कार्याच्या दरम्यान अवैध दारूविक्रेते व रेती माफियांच्या मुसक्या आवळून देवळीची कायदा व सुव्यस्था कायम ठेवली. शिवाय औद्योगिक वसाहतीतील विस्तारित कारखान्यांना विरोध करणाऱ्या खंडणी बहाद्दरांना त्यांची जागा दाखविण्याचे काम केले असल्याचे विचार खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. पोलीस निरीक्षक राणे यांच्या सेवा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

यावेळी देवळीकरांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला अतिथी म्हणून भाजपचे माजी प्रदेश सचिव राजेश बकाने, देवळी पालिकेतील काँग्रेसचे माजी गटनेते सुनील बासू , माजी जिल्हा शिवसेना उपप्रमुख अनंत देशमुख, देवळीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर,भाजप उपाध्यक्ष बंडू जोशी, हाजी अब्दुल हमीद, नप उपाध्यक्ष प्रा नरेंद्र मदनकर तसेच सत्कारमूर्ती तिरुपती राणे यांची उपस्थिती होती. विश्रामगृहाचे सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपस्थित अतिथींनी राणे यांच्या सेवा कार्याचा आढावा घेतला. यावेळी खासदार तडस यांचे हस्ते तिरूपती राणे यांचा विठ्ठल- रुखमाई ची मूर्ती तसेच शाल श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.

याशिवाय खासदार तडस यांचे हस्ते देवळी पोलीस स्थानकात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांचा शाल व श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. प्रास्ताविक प्रा नरेंद्र मदनकर यांनी केले. तसेच संचालन पत्रकार हरिदास ढोक यांनी केले. विविध कार्यकारी सेवा सहकारीचे अध्यक्ष शरद आदमने यांनीआभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाला माजी नप सभापती नंदू वैद्य, मारोती मरघाडे, विजय गोमासे,माजी प्राचार्य गणेश मालधुरे,सोपान लोखंडे, प्रा पंकज चोरे, श्याम घोडे, अशोक राऊत, माजी नगराध्यक्ष जब्बार तंवर व सुरेश वैद्य, माजी पस उपसभापती मारोती लोहवे, बजरंग दलचे दिनेश क्षीरसागर व संजय कामडी,गजानन राजूरकर, मस्जित ट्रस्टचे अध्यक्ष शेख हबीब, प्रकाश कारोटकर, नरहरी कामडी, दीपक फुलकरी, सौरभ कडू, दिलीप कारोटकर, वामन रघाटाटे, संतोष भोयर, श्रीकांत येनूरकर, वसंत तरास, अंकित टेकाडे तसेच नागरिकांची उपस्थिती होती.