आर्वी मतदार संघात काँग्रेसला खिंडारच खिंडार

कारंजा (घा.)/प्रतिनिधी येथील काँग्रेसचे पंचायत समितीचे माजी उपसभापती व माजी नगरसेवक प्रेम महिले यांनी ३० रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर येथे भाजपात प्रवेश घेतला. आ. दादाराव केचे, लोकसभा प्रमुख सुमीत वानखेडे, जिपच्या माजी अध्यक्ष सरिता गाखरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिले यांच्यासह आर्वी तालुक्यातील काँग्रेसचे माजी जिप सदस्य धनंजय चौबे, वर्धमनेरी येथील सरपंच संगीता नागोसे, नरेश बडिये, दादाराव चाफले, युवा नेते संजू चव्हाण, सुमित धुर्वे, लखन ओलन, गोविंद पाटील, कारंजा येथील प्रणय महिल्ले यांनी भाजपात प्रवेश घेतला. यावेळी कारंजा भाजपा तालुका अध्यक्ष मुकुंद बारंगे, आर्वी भाजपा तालुका अध्यक्ष प्रशांत वानखडे, विजय गाखरे, हरिभाऊ धोटे, अजय भोकरे, शरद बोके, मुन्ना अग्रवाल, बंडूभाऊ आलोडे, किरण मानकर, अशोक वाघमारे आदींची उपस्थिती होती. कारंजा शहरातील काँग्रेसच्या १० विद्यमान नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. त्यापाठोपाठ काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष शशिभूषण कामडी यांनीही काँग्रेसचा हात सोडत भाजपात प्रवेश केला. कारंजा शहरात काँग्रेसची स्थिती नाजूक झाली आहे.