वर्धा नदीच्या पुरात मद्यपींचा उच्छाद

पुलगाव/प्रतिनिधी निम्न वर्धा तसेच उर्ध्व वर्धा धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पुलगाव येथील वर्धा नदी ओसंडून वाहत आहे. त्यातच तीन मद्यपी पूल पार करण्याचा प्रयत्न करीत होते. पूर पाहायला आलेल्यांनी त्यांना पूल पार करण्यास मनाई केली. परंतु, दारूच्या नशेत असल्याने कोणालाही न जुमानता चक्क पुलावरून पाणी वाहत असताना तिघेही निघाले. परंतु अर्धा पुल पार केल्यावर पाण्याचा प्रवाह जास्ती वाढला आणि परत निघाले. तो थरारक व्हिडिओ बघ्यांनी समाज माध्यमांवर व्हायरल तुफान फिरत आहे. दारूची नशा या तिघांच्या जीवावर बेतत होती. नशीब बलवत्तर म्हणून तिघे थोडक्यात बचावले. वर्धा नदीवरील लहान पूल क्षतीग्रस्त झाला आहे.

या पुलावरून वाहतूक बंद केली असतानाही अनेक जण या पुलावरून प्रवास करतात. काल आलेल्या पुराचे पाणी पुलावर असताना तीन बेवड्यांनी वाहत्या पाण्यात दुचाकी टाकण्याचे धाडस केले. पूर पाहण्यासाठी आलेल्यांनी त्यांना पुलावरून जाण्यास मनाई केली. परंतु, त्यांन चढलेली दारू शांत बसु देत नव्हती. कोणाचेही न एैकता त्यांनी दुचाकी पुलावर टाकली. तिघांपैकी एक जण थोडा वेळ पाण्यातच झोपला. एकाने गाडी काढण्याकरिता पुलावरील अडकलेलं लाकूड फेकले. सुदैवाने तिघेही सुखरूप नदीच्या बाहेर निघाले. या पूल बंद असतानाही नागरिक या पुलावरून अवागमन करीत असतात. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिगेट्स लावून हा पूल बंद करण्याची मागणी होत आहे.