निकीता झाडे आत्महत्ये प्रकरणी अनेक प्रश्न!

वर्धा/प्रतिनिधी स्थानिक साईनगर डेहनकर लेआऊट परिसरातील निकीता झाडे या युवतीने ६ जुलै रोजी सकाळी घरीच आत्महत्या केली. आत्महत्या करण्याच्या आदल्या दिवशी तिचाा मित्र वृषभ जिकार याच्या सोबत फिरून आली होती. तो तिला शारिरीक व मानसिक त्रास देत होता. त्यानेच तिला आत्महत्येला प्रवृत्त केेले. तिच्या मृत्यूनंतर त्याने केलेला देखावा आणि पलायन त्यामुळे तोच दोषी असल्याचे सिद्ध होते. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुतार समाजाच्या वतीने पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. वृषाली झाडेची २०१६-१७ मध्ये वृषभ जिकार या युवकासोबत ओळख झाली. ओळखीतून मैत्री आणि पुढे प्रेम झाले. त्यापूर्वी तिच्या आईचे तर कोरोना काळात तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे निकीता व तिचा लहान भाऊ आजी सोबत राहत होते. ५ जुन रोजी निकीता दुपारी ३.३० ते रात्री १० वाजेपर्यंत वृषभ सोबत होते. ९.४५ वाजता वृषभने निकीताचा भाऊ सौरभला फोन करून निकीताला घ्यायला बोलवले. दुसर्या दिवशी सौरभ शिकवणीला गेला. त्यावेळी निकीता एकटीच घरी होती.

दरम्यान, वृषभने सौरभला फोन केले. शिकवणी संपल्यानंतर सौरभ घरी आला असता त्याला बहिणीने आत्महत्या केल्याचे दिसुन आले. याचवेळी वृषभही तिथे आला. थेट घरात जाऊन त्याने गळफास घेतलेल्या वृषालीचा मृतदेह खाली काढून तेथून पळ काढला. आदल्या दिवशी वृषालीने मी हरली, असे घरी म्हटले होते दुसयदिवशी तिने आत्महत्या केल्याने या दोघांमध्ये काय झाले त्यामुळे तिने आत्महत्या केली, असा प्रश्न पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. तिने आत्महत्या केल्यानंतर वृषभ घटनास्थळावर लगेच कसा आला यारून त्याला निकीता आत्महत्या करणार असल्याची पूर्व कल्पान होती काय? त्याने मृतदेह खाली उतरवण्याची घाई का केली? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले असुन निकीताच्या आत्महत्येस जबाबदार धरून पोलिस विभागात नोकरीवर असलेल्या वृषभवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुतार समाजाने केली आहे.