दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसी, सावंगीचे पाच विद्यार्थी जीपॅट राष्ट्रीय परीक्षा उत्तीण

वर्धा/प्रतिनिधी दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सावंगी येथील दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसीचे पाच विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील जीपॅट परीक्षेत प्राविण्य गुणांसह उत्तीर्ण होऊन पदव्युत्तर शिक्षणाच्या शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले आहेत. या जीपॅट परीक्षेत बी.फॉर्म. अंतिम वर्षाची विद्यार्थिनी गौरी डफ हिला सर्वाधिक ९९.६१ टक्के गुण प्राप्त झाले असून बी.फॉर्म. अंतिम वर्षाचेच विद्यार्थी समीर खिडकीकर याला ९८.०३ टक्के, प्रफुल्ल गुजरकर याला ९३.८१ टक्के, दीपाली बोकडे हिला ९२.९९ टक्के तर बी.फॉर्म. तृतीय वर्षाचा विद्यार्थी अनुप शेंडे याला ९९.६१ टक्के गुण प्राप्त झाले आहेत.

औषधी निर्माणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असून जीपॅट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा १२ हजार ४०० रुपये भत्ता पदव्युत्तर शिक्षणासाठी दिला जातो. देशभरातून ६२ हजार विद्यार्थी या राष्ट्रीय परीक्षेला बसले होते. या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्र े य महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना दिले आहे. अभिमत विद्यापीठाचे कुलपती दत्ता मेघे, प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, प्रकुलगुरू डॉ. गौरव मिश्रा, प्राचार्य डॉ. अनिल पेठे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. दीपक खोब्रागडे, उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र अग्रवाल, प्रा. सुकेशिनी लोटे, प्रा. पंकज डांगरे यांनी आगामी वाटचालीसाठी सदिच्छा देत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.