जे आवडतं ते करा; सर्व क्षेत्र समान- धर्माधिकारी

वर्धा/प्रतिनिधी तुमच्यात कुठलं कौशल्य आहे? तुम्ही काय करू शकता? कुठलं काम करताना तुम्हाला करताना आनंद मिळतो हे शोध आणि त्यात स्वतःला झोकून द्या व यश मिळावा. सर्व क्षेत्र समान आहेत ज्यात आपलं मन रमतं ते क्षेत्र चांगलं असे विचार चाणक्य मंडळ परिवाराचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केले. ते आ. डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारातून फॉम्यर्ुन फाउंडेशन तथा चाणक्य मंडळ अकॅडमीच्या संयुक्त वतीने आयोजित करिअर आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महिला विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. जी. भोयर, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनील गफाट, भोलानाथ सहारे व्यासपीठावर उपस्थित होते. आपल्या इथलं एुरा र्ॠीळवरपलश झीेसीरााश शिक्षण उत्तरपत्रिकेतल्या गुणांतच अडकलेले आहे. त्यातून सुप्त अंगभूत गुणांचा शोध घेतला जात नाही. घेतला गेला तर त्याच संवर्धन होत नाही.

नोकरी आणि भाकरीच्या शोधात आपल्या आवडीच्या क्षेत्रात जाणं होत नाही आणि झालं तर त्याला योग्य स्थान मिळत नाही मग उत्तम सर्वोत्तम कसं घडणार? तेव्हा आपल्याला जे आवडते ते करा, त्यात आपल्या प्रतिभा उजाळा – आणि प्रतिभावंत व्हा. स्पर्धा परीक्षा एक तपस्या असून आगामी काळात स्पर्धा परीक्षेचा आवाका अजून विस्तृत होईल परंतु योग्य नियोजन शिस्त, समर्पण, संयम आणि सातत्यपूर्ण यश हमखास मिळते असेही ते म्हणाले. विदर्भात तुलनेने स्पर्धा परीक्षांबाबत आस अजूनही दिसून येत नाही.

जे काही विद्यार्थी या परीक्षा उत्तीर्ण झालेत त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने प्रशासनावर छाप पडल्याचे दिसून येते. त्यातून आपल्या परिसरात गुणवत्ता खच्चून भरलेली आहे. परंतु, त्यांना तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन आवश्यक असतं याच हेतूने डॉ. पंकज भोयर यांच्या संयोजनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्राचार्य चंद्रकांत पोपटकर यांनी केले. दहावी, बारावी, पदवी झाल्यानंतर काय करावं हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनात असतो. आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली असताना रोज नवनवीन आव्हानांचा सामना आपल्याला करावा लागतो तेव्हा आपण कुठलं क्षेत्र निवडावं, निवडलेल्या क्षेत्रात यश कसं मिळवावं इत्यादि बाबींचा मंत्र जाणून घेण्याच्या दृष्टीने धर्माधिकारी सरांचे मार्गदर्शन अमूल्य असल्याचे मनोगत महिता विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. जी. भोयर यांनी केले. संचालन प्रा. संदीप पेटारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. मदन इंगळे यांनी केले.