विदर्भात आज पावसाची हजेरी

मुंबई/प्रतिनिधी पुणेकरांना आणि मुंबईकरांना मान्सूनसाठी आणखी दोन दिवस वाट पाहावी लागणार असून २५ जूननंतर या शहरात मान्सून येणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर विदर्भात आज मान्सूनचे आगमन झालेले आहे. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सावकाश पाऊस वाढेल असं सांगण्यात आलं आहे. विदर्भात आज मान्सूनने हजेरी लावली आहे. उपराजधानीसह अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी संथ तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी सुटकेचा श्वास सोडला. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक घाट परिसरात २५ तारखेपासून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर २७ जून नंतर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात येऊ शकतो.

सिंधुदुर्गात आज पावसाने हजेरी लावली असून बळीराजा आनंदीत झाला आहे. जिल्ह्यातील कणकवली, वैभववाडी, कुडाळ, लागल्या आहेत. मान्सून लांबल्याने नांदेड सावंतवाडी तालुक्यासह काही जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. नांदेड शहरातील नवीन मोंढा बाजारात दरवर्षी या दिवसात शेतकऱ्यांची मोठी गर्दी असते. परंतु मान्सून लांबल्याने या बाजारात शुकशुकाट पाहवयास मिळत आहे. नवीन मोंढा बाजारात बी बियाणांची दुकाने मोठ्या प्रमाणावर आहेत. काही शेतकऱ्यांनी बी बियाणांची खरेदी केली. पण अद्याप अनेक शेतकरी भागात लागला असून अर्धा अधिक जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान विभागाने आज उद्या तळकोकणात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज लागलेल्या या पावसाने बळीराजा आनंदीत झाला असून नियमीत पावसाकडे त्याच्या नजरा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकशेतकऱ्यांनी बी बियाणांची अद्यापखरेदी केली नाही.

बी बियाणांची विचारपूस करून शेतकरी जातअसल्याचे व्यापारी सांगत आहेत. हवामान विभागाने सुरुवातीला९६ टक्के पावसाचा अंदाजवर्तवला. मान्सून नेहमीप्रमाणे १ जूनला केरळमध्ये दाखल होण्याचाअंदाज वर्तवला. मान्सून ७ जूनलाकोकणात दाखल होण्याचा अंदाजवर्तवला. ९ जूनपर्यंत मान्सून पुणे,मुंबईसह महाराष्ट्र व्यापेल असाहीअंदाज व्यक्त करण्यात आला.मान्सून तळकोकणात ९ जूनला दाखल झाला खरा, मात्र मान्सून पुढे सरकला नाही. त्यानंतर मुंबई- पुण्यात मान्सून आगमनाची१६ जून ही नवी तारीख वर्तवण्यातआली. नंतर मान्सून आगमनाच्यातारखेत पुन्हा बदल करण्यात आलाआणि २३ जून ही नवी तारीख जाहीर करण्यात आली. २३जूनला काही ठिकाणी पावसाची हजेरी लागली.