हिंगणघाट येथे २१५ लाभार्थ्यांना लाभ मंजूरी आदेशाचे वितरण

वर्धा/प्रतिनिधी विविध योजनेच्या लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संपुर्ण राज्यात शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत हिंगणघाट येथे आयोजित शिबिरात २१५ लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ मंजूर करण्यात आले. या लाभार्थ्यांना आ.समीर कुणावार यांच्याहस्ते लाभ मंजूरी आदेशाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष आ.कुणावार यांच्यासह उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार सतिश मासाळ, मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, समितीचे अशासकीय सदस्य रजनीताई राईकवार, आकाश पोहाने, शंकर मुंजेवार, नलिनीताई सयाम, सुरेश ढोकपांडे, शंकर मोरे, आशिष पर्बत, गंगाधर कोल्हे, पंचायत समितीच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी नलिनी उगेमुगे, नायब तहसिलदार अजय राऊत आदी उपस्थित होते.

शासनाच्यावतीने निराधार, वृध्द, अपंग व्यक्तींर्साठी अनुदानाच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवून संजय गांधी निराधार योजना समितीच्यावतीने अर्जांची छाणनी करून पात्र लाभार्थ्यांचे प्रकरण मंजूर केले जाते. शासन आपल्या दारी अभियानांतर्गत या लाभार्थ्यांना कालमर्यादेत लाभ मंजूर करता यावा यासाठी विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकून २३३ लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जांपैकी परिपुर्ण असलेले संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे ६५ अर्ज मंजूर करण्यात आले. श्रावणबाळ राज्य सेवानिवृत्तीवेतन योजनेचे ८९ अर्ज, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे ६१अर्ज असे एकून २१५ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूरकरण्यात आले.

या लाभार्थ्यांना समितीचे अध्यक्ष तथा आमदार समीर कुणावारयांच्याहस्ते लाभ मंजूरी आदेश वितरीतकरण्यात आले. एकून १४ अर्जांमध्ये त्रृट्या आढळून आल्या. त्रृट्या पुर्ण करून अर्जांवर कारवाई केली जाणार आहे. हिंगणगाट उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थितहोते. शेवटी नायब तहसिलदार सागर कांबळेयांनी आभार मानले.