जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीवर भर द्यावा- रोहन घुगे

वर्धा/प्रतिनिधी शेतकऱ्यांनी फळबाग क्षेत्र वाढविण्यावर भर द्यावा. फळबाग लागवडीसाठी सिंचन विहिरी,शेततळे व धडक सिंचन योजनेच्यामाध्यमातून सिंचन सुविधा उपलब्धकरून दिली जाते. भाजीपालव फळपिके घेतल्यास ग्रेडिंग वपॅकिंग करून जिल्ह्याबाहेर सुद्धाविकता येतात. येणाऱ्या खरीपहंगामाची तयारी करीत असताना बिबिएफ तंत्रज्ञानाचा वापरकरून पेरणी करावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगेयांनी सांगितले. कृषि विज्ञान केंद्रराष्ट्रीयबागवानी बोर्ड आणि एवोनिथपुरस्कृत व बायफ इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लाइव्हलीहुड्स अँडडेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमानेराष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गतखरीप हंगामपूर्व शेतकरी मेळाव्याचेआयोजन विकास भवन येथे करण्यातआले होते. त्यावेळी ते बोलतहोते. यावेळी श्री.घुगे यांच्यासहराष्ट्रीय बागवानी बोर्ड, नागपूरचेउपनिदेशक सतीशकुमार शर्मा, वरिष्ठशास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.जीवन कतोरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, नाबार्डचे जिल्हाव्यवस्थापक सुशांत पाटील, जिल्हाअग्रणी बँक प्रबंधक चेतन शिरभाते,स्मार्ट प्रकल्पाचे गुलाबराव भदाणे, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. नागनाथ जंगवाड, दिपक तपासे, एवोनिथ सीएसआर प्रमुख विद्या पाल उपस्थित होते.

राष्ट्रीय बागवानी बोर्डचे उपनिदेशक सतीशकुमार शर्मा यांनी फळबागेविषयी विविध योजना, पॉलीहाऊस उभारणीचा खर्च व त्यासंबंधी शेतकऱ्यांसाठी विविध योजना याबद्दल माहिती दिली. या या ेजना ंबाबत श ेतकऱ्या ंनी एनएचबीच्या ुुु.पहल.सर्ेीं.ळप या वेबसाईट वरून माहिती घ्यावी असे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ.जीवन कतोरे यांनी केले. मान्सूनच्या आगमनाची परिस्थिती बघता शेतकऱ्यांनी कोणकोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत याविषयी श्री.कतोरे यांनी माहिती दिली. प्रभाकर शिवणकर यांनी शेतकऱ्यांनी पारंपारिक पिक पद्धतीमध्ये बदल करून उपलब्ध व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून जिल्ह्यात नवीन पिक पद्धत अवलंबण्यावर भर द्यावा, असे सांगितले. चेतन शिरभाते यांनी फळबाग लागवड, ग्रीन हाऊस, पॉलीहाऊस यासाठी कर्जसुविधा व अनुदान उपलब्ध असल्याचे सांगितले. सुशांत पाटील यांनी फळबागेमध्ये यांत्रिकीकरणाचा व त्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योगउभारावा, यासाठी जवळपास २५ ते ३५ टक्के अनुदान मिळते याबद्दलमाहिती दिली.

एवोनिथच्या विद्या पाल यांनी एवोनिथ व बायफ यांनीएवोनिथच्या कार्याबद्दल माहितीदिली. स्मार्ट प्रकल्पाचे गुलाबरावभदाणे यांनी स्मार्ट प्रकल्पांतर्गतविविध उपक्रमांची याविषयी माहितीदली. प्राचार्य डॉ. नागनाथ जंगवाडयांनी कृषि शिक्षणाच्या संधी व प्रवेशप्रक्रिया, मनोज भवरे यांनी नरेगा योजनेंतर्गत विविध प्रकल्प, डॉ. रुपेशझाडोदे यांनी खरीप हंगामपूर्व तयारीव प्रमुख खरीप पिक व्यवस्थापन, डॉ. निलेश वजिरे यांनी बिजप्रक्रियाव प्रमुख खरीप पिकांचे कीड व रोगव्यवस्थापण, डॉ. सचिन मुळे यांनीपावसाळ्यात पाळीव जनावरांचीघ्यावयाची काळजी, डॉ. प्रेरणाधुमाळ यांनी आहारात पौष्टिकतृणधान्याचे महत्व, गजानन म्हसाळयांनी माती परिक्षण अहवालानुसार खरीप हंगामातील पिकांचे खतव्यवस्थापण याबद्दल माहिती दिली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन मुळे यांनी केले.