दर्शनाचा खून मीच केला… राहुल हंडोरेची पोलिसांसमोर कबुली

पुणे/प्रतिनिधी राजगडाच्या पायथ्याशीदर्शना पवारचा मृतदेह सडलेल्याअवस्थेत आढळलो होता.त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. नंतर शवविच्छेदनअहवालातून तिचा खून झाला असल्याचे समोर आले होते.वेल्हे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता दर्शनाचा मित्र राहूल हंडोरेलाअंधेरी रेल्वे स्टेशनवरून अटक करण्यात आली आहे. प्राथमिकमाहितीनुसार, लग्नाला नकारदिला म्हणून राहुलने दर्शनाचा खून केल्याचा पोलिसांनी अंदाजव्यक्त केला. राहुल हंडोरेला अटककेल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीपत्रकार परिषद घेत दर्शना पवार हत्या प्रकरणाची माहिती दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे (वय २८ वर्षे, रा. हिंगणे होम कॉलनी, दत्तमंदीराजवळ, कर्वेनगर, पुणे, मुळ रा. मु.पो.शहा, ता. सिन्नर, जि. नाशिक) हा गुन्हयातील मुख्य संशयित असल्याचे व तो गुन्हा घडल्यापासून पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यावरून तपास पथकांनी संशयित राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन अंधेरी रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले. राहुलने गुन्हा केल्याचे कबुल केला आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास ते गडाकडे निघाले होते. माघारी येताना (पावने अकरा) राहूल एकटाच आला होता. खून केल्यानंतर तो बंगालसह महाराष्ट्रत विविध ठिकाणी रेल्वेने फिरत होता. दर्शना आणि राहुल एकमेकांचे नातेवाईक नव्हते पण त्यांची ओळख लहापणापासून होती. दर्शनाच्या मामाचे घर आणि आरोपीचे घर समोरासमोर होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आल्याच्या निमित्ताने पुण्यातील स्पॉट लाईट अकादमीमध्ये दर्शनाचा सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी दर्शनाने उत्तम भाषणही केले होते. जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते अशी प्रतिक्रिया तिने भाषणांत दिली होती.

प्रत्येकाच्या लाईफची स्टोरी…

भाषणात दर्शना म्हणाली होती की, प्रत्येकाच्या लाईफची स्टोरी आहे. ती ऐकण्यासाठी लोकं तेव्हाच इतके उत्सुक असतात जेव्हा ती स्टोरी आपल्याकडे यशस्वी स्टोरी म्हणून येते. आपण स्कूल आणि कॉलेजमध्ये चांगला परफॉर्मन्स करतो. पण आज एवढा सत्कार होतोय, इतके लोकं आपल्याशी बोलतायेत, ते आपल्या मुलींना घेऊन येतात. अभ्यास कसा केला पाहिजे हे विचारतात. जेव्हा आपण अपयशी ठरतो ना, ते आपले दोष असतात की, आपण अभ्यास कमी केला असेल, आपण डायव्हर्ट झालो असेल. पण जेव्हा आपण यशस्वी होतो ना, तेव्हा त्यामागे खूप लोकांची मेहनत असते. माझ्या घरामध्ये मला आई-वडिलांनी कधीच सांगितलं नाही की, तू हे नाही करु शकत. त्यांना खूप आत्मविश्वास आहे. त्यात त्यांचा महत्वाचा रोल आहे. ते नेहमी मला पुश करत असतात. त्यामुळे मी सर्व माझ्या कुटुंबाचे, माझ्या मित्र, मैत्रणींचे खूप खूप आभार मानते असे म्हणत दर्शनाने भाषण संपवले.