सामान्य रुग्णालयाच्या आयुष विभागात योग दिन साजरा

वर्धा/प्रतिनिधी जागतिक योग दिनानिमित्त आज सामान्य रुग्णालयातील आयुष विभागात प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीकांत इंदुरकर, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदिप नखाते यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयुष विभागाचे योग शिक्षक डॉ. शंकर तायडे यांनी उपस्थितांना योग प्रात्याक्षिके करुन आसने करुन घेतली. यावेळी डॉ. संदिप नखाते यांनी धन्वंतरीच्या फोटोला हारअर्पण करुन उपस्थितांना योगदिन व दैनंदिन जिवनातील योगाचे महत्व सांगितले.

डॉ. शंकर तायडे यांनी तणावमुक्तीसाठी योग व या योगदिनाचे घोषवाक्य हर आंगण योग याचे महत्व पटवून दिले. तर काही दैनंदिन योगवर्गातील रुग्णांनीत्यांचे अनुभव कथन करुन योगाचेमहत्व सांगितले. कार्यक्रमाला डॉ. परागराऊत, डॉ.विक्रात चिखले,जयश्री मिसाळ, इंदिरा शेंडे, हर्षद ढोबळे, नुरुल शेख, प्रविण गावंडे,आयुष विभागातील डॉ. सिमालोहकरे, डॉ. आश्विनी डोणे,डॉ. शगुफ्ता अहमद, डॉ. योगिता भेडे, डॉ. अनुपमा जनईकर,श्याम ठाकरे, अरुणा भागवत,मनिषा कलवडे इतर वैद्यकीयअधिकारी व कर्मचारी तसेचनर्सिग स्कुलच्या विद्यार्थीनी मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचेआभार प्रदर्शन सिमा लोहकरेयांनी केले.