निरोगी आयुष्यासाठी योगा आवश्यक- खासदार रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी आपल्या आरोग्याची काळजी केवळ योगाच घेऊ शकते, त्यामुळे योगाचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी सर्वांनी योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आज येथे केले. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, जिल्हा प्रशासन, वर्धा, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, वर्धा, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, वर्धा, नेहरू युवा केंद्र, वर्धा आणि पतंजली योग परिवार, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा क्रिडा संकुल येथील मैदानावर जागतिक योग दिन” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहण घुगे, पोलिस अधिक्षक नुरूल हसन, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सागर कवडे, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, जिल्हा क्रिडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, नेहरू युवा केंद्राचे शिवधन शर्मा, योग प्रशिक्षक म्हणून पतंजली योग परिवार वर्धाचे जिल्हा प्रभारी प्रशांत सावरकर, वनिता चलाख उपस्थित होते.

खासदार तडस म्हणाले की, सन २०१५ या वर्षा पासून जागतिक योग दिनाला सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी जगापुढे ठराव मांडल्यावर १७१ देशांचा पाठींबा मिळाला आणि जागतिक दिनाला सुरूवात झाली. योगा ही जिवनात फार मोठी संपत्ती आहे. येणा-या काळात आरोग्याची काळजी केवळ योगाच घेऊ शकते, असे ते यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी कर्डीले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाची संकल्पना मांडली. या योग दिनाचा जगभर प्रसार झाला. योग दिन हे केवळ भारताची देणगी आहे. नागरीकांनी योगाचा प्रसार जास्तीत जास्त करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी योग प्रशिक्षक प्रशांत सावरकर आणि वनिता चलाख यांनी नागरीकांना योगाच्या विविध आसनांचे प्रात्याक्षिक करून दाखविले. त्यात स ुयर् नमस्कार, ताडासन, वृक्षासन, पाडहस्तासन, भुजंग आसन, मकरासन, कपालभाती, अनुलोम विलोम प्राणायम, भामरी प्राणायम, ध्यान आदी विविध आसनांचा समावेश होता. यावेळी उपस्थित मान्यवर व नागरीकांनी योगासने केली. भरत ज्ञान मंदिरम शाळेतील दहावीची विद्यार्थीनी कु. साईश्वरी किरणराव भावरकर हिने विविध योग प्रात्याक्षिके करून दाखविले. प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले. संचालन स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक नितेश झाडे यांनी केले. तर आभार जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा यांनी मानले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरीकांनी हजेरी लावली होती.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हाक्रिडा अधिकारी कार्यालयाचे क्रिडा अधिकारी संदीर खोब्रागडे, क्रिडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, क्रिडा संकुलय व्यवस्थापक रवि काकडे, पतंजली योग परिवाराचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत सावरकर, जिल्हा प्रभारी महिला वनिता चलाख, अरुण नवघरे, दिपक भुतडा, आशिष मुडे, हरिष मांडवगडे, नयनबाभुळकर, संजुभाऊ आष्टनकर, किरण भावरकर, बबनराव भजबुजे, विलास मेघे, श्री. किनकर, मधुकर लाखे, अमर परघन, संगीता इमले, ज्योती शेटे, कल्पना शेंद्रे, उषा कढव, सुजाता सावरकर, वर्षा मारबते,सारिका काळे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.