केंद्र सरकारचा ९ वर्षांचा कार्यकाळ हा ऐतिहासिक आणि गरिबांच्या कल्याणाचा सुवर्णकाळ- खा. रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा ९ वर्षांचा कार्यकाळ हा ऐतिहासिकआणि गरिबांच्या कल्याणाचासुवर्णकाळ आहे. गेल्या ९वर्षात केंद्र सरकारने गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजनाराबवल्या आहेत आणि त्याचा थेट फायदा गरीब आणि शेतकयांना मिळवून देण्याचे कामकेले आहे. पंतप्रधान मोदींनीआपल्या कार्यकाळात देशालापुढे नेण्यासोबतच देशातील प्रत्येकघटकाच्या विकासाचीही काळजीघेतली. कोरोनाच्या काळात जिथेजगातील मोठे देश हतबल झाले होते, तिथे मोदी सरकारने केवळ सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली तसेच ८० कोटी गरीबकुटुंबांना १८ महिन्यांहून अधिक काळ मोफत रेशन देखील दिले गेले.

आयुष्यमान भारत-पंतप्रधानजनआरोग्य योजना, प्रधानमंत्रीकिसान सन्मान योजना, प्रधानमंत्रीउज्वला योजना, मुद्रा योजना,प्रधानमंत्री आवास योजना,प्रधानमंत्री स्वनिधी योजना,श्रमकार्ड, सुकन्या योजना,पीक विमा योजना तसेच विविध योजनेच्या माध्यमातुन लाभार्थ्यांनालाभ मिळत असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले. ते देवळी येथे लाभार्थी सम्मेलनातबोलत होते देवळी येथे केन्द्र सरकारच्या ९ वर्षा निमीत्य लाभार्थी सम्मेलनखासदार रामदास तडस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले, यावेळी उपविभागीय अधिकारी दिपककरंडे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनिलगफाट, वर्धा लोकसभा निवडणूकप्रभारी सुमीत वानखेडे, देवळी विधानसभा निवडणेक प्रभारी राजेश बकाने, जयंत कावळे, संजय गाते, मुकेश भिसे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर गवाळकर, सौ. शोभा तडस, सौ. वैशाली येरावार, श्रीमती सुचिता मडावी, डॉ. नरेन्द्र मदनकर, जयंत येरावार, नितीन बडगे, उमेश अग्नीहोत्री, राहुल चोपडा, तालुका अध्यक्ष दशरथ भुजाडे, शहर अध्यक्ष रवी कारोटकर, अरविंद नागतोडे, सौरभ कडू, प्रभारी तहसीलदार दत्तात्रय जाधव, नायब तहसीलदार सोरते व शेंडे, पुरवठा विभागाचे माजरखेडे उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, श्रमकार्ड, राशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, पंतप्रधान आयुष्मान भारत योजना, जागेचे पटटे तसेच विविध योजनेच्या लाभार्थ्याना प्रमाणपत्र तसेच योजनेच्या लाभाचे पत्र देण्यात आले. ग्रामीण रूग्णालय देवळी तर्फे उपस्थित लाभार्थ्यांच्या आरोग्य तपासनी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तावीक तहसीलदार दत्तात्रय जाधव, संचालन दिपक फुलकरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार किशोर गवाळकर यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य नंदकिशोर वैदय, राजेश रोकडे, उमेश कामडी, विनोद राठोड, मानसिंग झांझोटे, मोहन पोहेकर, माधुरी इंगळे, निलीमा पळसकर, संबधीत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाला यावेळी सुरज कानेटकर, संजय मुजबैले, राजु झिल्पे, वैभव श्यामकुवर, किशोर लुगे, शुंभागी कुर्जेकर, ज्योती खाडे, सुनिता बकाने, सुनिता ताडाम, माला लाडेकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.