रोहण्यात शासकीय “बडगा’ कधी?

वर्धा/प्रतिनिधी आर्वी तालुक्यातील रोहणा येथील वाळूघाटावरून शासनाच्या डोळ्यात रेती झोकून रेतीचा उपसा ण्यात आला. वाळू डेपोतील बांधकाम साइडवर पोहोचली. वाळू घाट घेणार्यांनी सुरुवातीला स्वत: राजकारणात असल्याचा फायदा घेतला. त्यानंतर पुन्हा बड्या असामीला भेटल्याचे राळ उठवली. त्यामुळे हा घाट प्रत्येकाचे लक्ष ठरत असुन या घाटावर “बडगा’ कधी असा प्रश्न वाळू व्यापार्यांसह सामान्य नागरिकांना पडला आहे. आर्वी तालुक्यातील नागरिकांना शासकीय दरात वाळू मिळावी, याकरिता रोहणा येथे डेपो देण्यात आला आहे. या डेपोकरिता सालफळ दिघी-वडगाव या घाटातून वाळू करायचा होता.

डेपोधारकाने या दोन्ही घाटातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला असून त्या तुलनेत डेपोवर नगण्य साठवणूक करण्यात आली.  त्यामुळे सुरूवातीपासूनच हा डेपो वादग्रस्त ठरला असून उपविभागीय अधिकार्यांनी १२ लाख ७० हजारांचा दंडही ठोठावला. आता या दोन्ही घाटातून काढलेली वाळू डेपो सोडून थेट आर्वी तालुक्यासह इतर ठिकाणच्या कंत्राटदाराच्यासाइडवर गेल्याची माहिती पुढेआली आहे. हा दंड रद्द करण्यासाठीराजकीय व्यक्तींर्चा वापरही करण्यातआला. परंतु, प्रशासनाने त्यालाफारसे मनावर घेतले नाही. मात्र, १२ लाख रुपयांच्या दंडापेक्षा जास्तर ेतीचा उपसा करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.