पावसाचा मागमूस नसल्याने सिंदी भागातील पेरण्या लांबल्यात

सिंदी रेल्वे/प्रतिनिधी यंदा मृग नक्षत्र कोरडे जाण्याचा धोका संभवत असून उष्णतामान दररोज वाढतच आहे. पावसाचा मागमूस नसल्याने पेरण्या व कपाशीची लागवड लांबणार आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मृग नक्षत्रात केवळ १२ जूनला चक्रीवादळाचा पाऊस आला. त्यानंतर वरुणराजा वाकुल्या दाखवत आहे. रोजच्या उष्णतामानात वाढ जाणवत नसली तरी उष्णता कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. या आठवड्यात एक थेंब पाऊस पडला नाही. हंगामाची जय्यत तयारी करण्यात आली असून देखील शेतकरी धुळपेरणी करण्याचे किंवा पाशीची लागवड करण्याचे धाडस व कृतिकाचा पाऊस थोडाफार पडला असता तर शेतकर्यांनी जोखीम पत्करून लागवड केली असती.

मात्र, यावर्षी मृग नक्षत्र कोरडे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकरी जुगार खेळण्यास नकार देत होते. सलग तीन वर्षे झाली कपाशीचे उत्पादन घेतांना खर्च वाढत गेला. सोयाबीनचे उत्पन्न घटले.भाव देखील स्थिरच आहे.कपाशीचे उत्पन्न बरे झाले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा विक्रमी दर मिळालेच नाही. त्यामुळे घरी साठवून ठेवलेले पाढरे सोने शेवटी जो भाव मिळाला त्यात विकण्याची वेळ शेतकर्यांवर आली. यंदा कापसाच्या नादी लागायचे नाही, असा करीत नाही. शेतकरी महागडे बियाणे कापसाचे भाव वाढतील अशी मानस अनेकांचा आहे. यावर्षी जमिनीत टाकण्याचा आगाऊपणा करण्यास तयार नाही. पाच दिवसात शेतकर्यांनी बी-बियाण्यांची तजवीज रून ठेवली आहे. शिवाय पेरणीपूर्व शागत देखील केली आहे. रोहिणी अपेक्षा असतानाच सरकारने विदेशातील कापूस आयात केल्याने विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्यांचा हिरमोड झाला आहे. विविध प्रकारच्या वायरसमुळे सोयाबीनच्या क्षेत्रफळात १० टक्के वाढ अपेक्षित आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.