“आदिपुरुष’वर अनुराग ठाकूर यांची कठोर भूमिका!

नवी दिल्ली/प्रतिनिधी आदिपुरुष चित्रपटाबाबत सुरुअसलेल्या गदारोळा दरम्यान केंद्र सरकारकडून तीव्र टिप्पणी करण्यातआली आहे. देशातील कोणालाहीधार्मिक भावना दुखावण्याचाअधिकार नाही, असे केंद्रीयमाहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागठाकूर यांनी स्पष्ट केले. केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर म्हणतात की, सेन्सॉर बोर्डाला यावर जो काही निर्णय घ्यायचा होता, तो त्यांनी घेतला आहे. हे त्याचे काम आहे.चित्रपटातील संवाद बदलण्याबाबतचित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक बोलले आहेत. धार्मिक भावनादुखावण्याचा अधिकार कोणालाहीनाही. याशिवाय केंद्रीय मंत्री अनुरागठाकूर यांनी पाटणा येथे २३ जून रोजी होणाऱ्या बैठकीबाबत विरोधीपक्षांवर निशाणा साधला. जे विरोधीपक्ष बिहारमध्ये जात आहेत त्यांनी नितीश कुमार यांना तिथे सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत विचारावे, असे त्यांनी म्हटले आहे. १७०० कोटी रुपयांचा हा पूल पत्त्याच्या घरासारखा एकदा नव्हे तर अनेक वेळा कोसळला आहे. शेकडोकोटींचा रुग्णवाहिका घोटाळाझाला आहे.