अ.भा. काँग्रेस समितीकडून मंडळ समिती स्थापनेबाबत वारंवार विचारणा, काँग्रेस नेत्यांचा निरुत्साह; प्रदेशाध्यक्ष नाराज

वर्धा/प्रतिनिधी भाजपाच्या त ुलन ेत संघटना मजबूत करण्याबाबत उशिरा जाग आल्याचे काँग्रेसबाबत म्हटल्या जाते. तरीही अद्याप निरुत्साहच दिसून येत असल्याने ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत. राजस्थान येथे झालेल्या शिबिरात झालेल्या निर्णयानुसार अखिल भारतीय काँग्रेस समितीने मंडळ काँग्रेस समित्या स्थापन करण्याचे निर्देश प्रदेश समित्यांना दिले होते. त्या अनुषंगाने प्रदेश समितीने अनेक बैठकींर्तून याविषयी सूचित केले.

मात्र तरीसुद्धा या समित्या स्थापन न केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी एका पत्रातून स्पष्ट केले. या समित्यांबाबत अखिलभारतीय काँग्रेस समितीकडून वारंवार विचारणा होतअसल्याचे निदर्शनास आणून प्रत्येक जिल्ह्यातील मंडळसमितीची माहिती २६जूनपर्यंत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंडळ समितीत अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक कोषाध्यक्ष, पाच सरचिटणीस व दोन सदस्य अशी रचना असून यात पन्नास टक्केमहिलांचा समावेश करण्याचीसूचना आहे.