कारंजा येथील उड्डाण पुलावरून धावली वाहतूक; नागरिकांनी घेतला मोकळा श्वास

कारंजा (घा.)/प्रतिनिधी स्थानिक कारंजा शहरातील मध्यवस्तीत ून ग ेल ेल्या राष्ट ्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास जाऊन कारंजा शहरातून जाणारी जड वाहतूक आता उड्डाण पुलावरून धावत आहे. महामार्ग ओलांडणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांनी मोकळा स्वास घेतला आहे. त्यामुळे कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने समाधान व्यक्त केले आहे. पूर्वी कारंजा शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम झाले तेव्हाच इथे उड्डाणपूल होणे गरजेचे असताना मात्र उड्डाण पुल होऊ शकला नव्हता. परंतु कालांतराने मात्र शालेय विद्यार्थी, नागरीक महामार्ग ओलांडत असताना अनेकदा अपघात घडून आले होते. विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घालून मार्ग ओलांडावा लागत असे. २००८ ते २०१८ दरम्यान महामार्ग ओलांडताना या परिसरात अनेकांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते.

त्यावेळी २०१८ मध्ये कारंजा शहरातील सर्वपक्षीय नागरिक,विविध सामाजिक संघटना, शिक्षक,विद्यार्थी,पत्रकार यांनी एकत्र येऊनकेंद्र शासनाकडे उड्डाणपुलाचीमागणी केली होती. त्यावेळी केंद्रीयपरिवहन मंत्री नितीनजी गडकरयांचे स्वीय सहाय्यक सुधीरजीदिवे यांनी नागरीकांच्या मागणीची दखल घेऊन उड्डाण पुलाच्या मंजुरीकरीता विशेष सहकार्य केले होते. व उड्डाण पुल मंजूर झाला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०१८मध्ये निविदा निघाली होती.परंतु निविदा निघाली पण काम सुरू होण्यास विलंब होत होता. त्यावेळी उड्डाणपुलाचे काम कधी सुरू होणार ? याकरीता नागरिकांनाआणखी संघर्ष करावा लागला.

स्थानिक कारंजा नागरी समस्यासंघर्ष समितीने केंद्रीय मंत्री नितीनजीगडकरी यांचा नागपूर येथे जनता दरबार गाठून उड्डाणपुलाचे काम चालू करण्याची मागणी लावूनधरली होती. अखेर जानेवारी २०२१ मध्ये उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवातझाली होती. दीड वर्ष बांधकाम सुरळीत चालले परंतु १५ मार्च२०२२ पासून मुरूम उत्खननाच्या नवीन परवानगी अभावी ९ महिने उड्डाणपुलाचे बांधकाम रखडले होते.त्यावेळी स्थानिक कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने पुन्हा केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी यांचे नागपूरयेथील कार्यालय गाठून रखडलेले बांधकाम पूर्ण करा अशी मागणी लावून धरली होती.

त्याम ुळ े प ुन्हा १ डिस ेंब २०२२ पासून रखडलेले बांधकाम सुरळीत सुरू झाले. आणि अखेर उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास जाताच सर्विस रोडने होणाऱ्या जडवाहतुकीची अडचण लक्षात घेता नागरीकांना दिलासा देण्याकरीता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यापरवानगीने उड्डाणपूल वाहतुकीस खुला केला असल्याचे जांडूकंट्रक्शन कंपनीचे जनसंपर्कअधिकारी श्री. पाटील यांनी नागरीसमितीला कळविले आहे. आता महामार्गावरील सर्ववाहने उड्डाण पुलावरून जातअसल्याने नागरिकांनी मोकळाश्वास घेतला आहे. उड्डाण पूलर्णत्वास जाऊन सुरू झाल्यास्थानिक कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने समाधान व्यक्त केले आहे.