वारकऱ्यांसाठी खुशखबर! आषाढी एकादशीनिमित्त रेल्वेच्या ७६ विशेष गाड्या

मुंबई/प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरला विठ्ठल- रखुमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्यरेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. विठ्ठल भेटीची आस घेऊन पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्यरेल्वेकडून विशेष ७६ रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. यंदा आषाढी एकादशी २९ जून रोजी येत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक ंढरपूरला जात असतात. याचपार्श्वभूमीवर मध्रेल्वेकडून २३ जून ते ३ जुलै या कालावधीत रेल्वेच्या७६ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यातआला आहे. या विशेष रेल्वेचे वेळापत्रकही मध्य रेल्वेकडून प्रसिद्ध केले असून तुम्हीही हे वेळापत्रक जाणून घेऊ शकता. पंढरपूर आषाढी एकादशीनिमित्त रेल्वेच्या नागमिरज, नागपूर-पंढरपूर यासह नवीन अमरावती-पंढरपूर,ामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंमिरज-पंढरपूर, मिरज-कुडर्ूवाडी विशेष गाड्यालवण्यात येणार आहेत. त्यामुळे लाखो भाविसोय होणार आहे.

नागपूर – पंढरपूर स्पेशल : ही ट्रेन क्रमांक०१२०७ नागपूरहून २६ जून आणि २९ जून २०२३ रोजी सकाळी ८.५० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता गाडी पंढरपुरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी पंढरपूरहून १२०८ विशेष क्रमांकाची गाडी २७ आणि ३० जून रोजी सायंकाळी५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला एक सेकंड वातानुकूलित, दोन तृतीयवातानुकूलित, १० स्लीपर क्लास आणि सात सामान्यद्वितीय श्रेणी यासह दोन लगेज कम गार्ड ब्रेक असणार आहे. या स्थानकांवर थांबणार- अजनी, वर्धा, पुलगाव,धामणगाव, चांदूर रेल्वे, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला,शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुडर्ुवाडी येथे थांबते.

नवीन अमरावती – पंढरपूर स्पेशल : नवीन अमरावती येथून गाडी क्रमांक ०१११९ विशेष २५ आणि २८ जून रोजी दुपारी २:४० वाजता पोहोचेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९:१० वाजता पंढरपुरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी पंढरपूरहून गाडी क्रमांक ०११२० विशेष गाडी २६ व २९ जून रोजी रात्री ७.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४० वाजता नवीन अमरावती स्थानकात पोहोचेल. या स्थानकात थांबणार – बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुडर्ुवाडी स्थानकवार थांबेल. या ट्रेनला एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, १० स्लीपर कोच, सात सामान्य द्वितीय श्रेणी किंवा दोन लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅन असतील.