अवैध रेतीसाठा आढळलेल्या भुखंडाच्या मालकावर देखील होणार कारवाई

वर्धा/प्रतिनिधी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातठिकठिकाणी अवैध रेतीसाठ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी टाकूनकारवाई केली जात आहे. अवैध साठा बहुतांश ठिकाणी खाजगीभुखंडावर साठवल्याचे दिसूनआले. त्यामुळे अवैध रेतीसाठीज्या भूखंडावर आढळून येईल, त्या भुखंड मालकावर देखील कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनीसर्व तहसिलदारांना दिले आहे. गेल्या चार दिवसांपासून अवैधरेतीसाठ्याचा शोध घेऊन कारवाईकेली जात आहे. हिंगणघाट शहर वपरिसरातील काही गावे तसेच वर्धा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध साठा आढळून आला आहे. हा सर्व साठा जप्त करून महसूल प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. ही रेती घरकुल लाभार्थ्यांना वितरीत करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

काही ठिकाणी रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे दिसल्याने त्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांच्या कारवाईत जप्त केलेली हिंगणघाट येथील काही रेती हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या आवारात तर काही रेती पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार जप्त केलेल्या ठिकाणावरूनउचलून जमा करण्याची कारवाई सुरु होती. रात्री ११ वाजताच्या दरम्यान वर्धा तहसिलदार रमेश कोळपेव त्यांच्या पथकाने मसाळा येथे असलेल्या अवैध रेतीसाठ्यावरधाड टाकली. येथे अंदाजे ५५ब्रास रेतीसाठी आढळून आला. हासर्व साठा ताब्यात घेण्यात आला.यावेळी पथकामध्ये तहसिलदारकोळपे यांच्यासह नायब तहसिलदारबाळूताई भागवत व पोलिसकर्मचाऱ्यांचा समावेश होता.

गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या या कारवाईत बहुतांश रेती खाजगी जमिनीवर अवैधपणे समितीच्या आवारात काल रात्री साठवल्याचे आढळून आले. अवैध उशीरापर्यंत जमा करण्यात आली. वर्धा शहराशेजारी आढळलेली रेती नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोकळ्या जागेत जमा करण्यात आली. काल दिवसभर ही रेती रेतीच्या व्यवसायात गुंतलेल्यकाही व्यक्तींर्कडून रेतीचे छोटेछोटे साठे खाजगी भुखंडावरकेले असल्याची शक्यता आहे.त्यामुळे ज्या भुखंडावर असेसाठे आढळून येतील त्या भुखंड मालकांवर देखील कारवाई करण्याचेआदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदारांना दिले आहे. अवैध रेतीची शोधमोहीम राबवून कारवाईअधिक व्यापक करण्याची सुचना देखील जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेयांनी केली आहे.

अवैध उत्खनन, वाहतूक, साठ्याची माहिती द्या

अवैध रेतीसाठा, वाहतूक तसेचगौणखनीजांचे अवैध उत्खनन होतअसल्याचे निदर्शनास आल्यासनागरिकांनी प्रशासनाला माहितीदेऊन सहकार्य करण्याचे आवाहन पुन्हा जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेयांनी केले आहे. नागरिकांना ही माहिती देता यावी म्हणून ८३२९७५०३४२ हा विशेष व्हाट्सपक्रमांक सुरु करण्यात आलाआहे. नागरिकांनी या क्रमांकावर संदेश पाठवून अवैध रेतीसामाहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीसांगितले.