बस म्हणजे संपूर्ण राज्यातील खेड्यापाड्यांना एकत्र जोडणारी जीवन वाहिनी- खा. रामदास तडस

सेलू /प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाची बस म्हणजे संपूर्ण राज्यातील खेड्यापाड्यांना एकत्र जोडणारी जीवन वाहिनी व ग्रामीण-शहराला जोडणारा दुवा आहे. ग्रामीण भागात जाण्यासाठी एकमेव साधन बस आहे, पुर्वी एस.टी.महामंडळाला नेहमी नुकसान सहन करावे लागत होते, परंतु आज शिंदेफडणवीस सरकरच्या राज्य परिवहन महामंडळ संबधीत योग्य निर्णयामुळे एस.टी.महामंडळाला फायदा होत आहे, तसेच कर्मचायांना न्याय देण्याचे कार्य सुध्दा या सरकारने केलेले आहे. तालुक्यातील बसस्थानके नुतनीकरण व अत्याधुनिक बांधकाम करुन नागरिकांना सुविधा देण्याचे कार्य करीत आहे, २०२३ हे वर्ष राज्य परिवहन मंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष असुन आज आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे. येत्या काळात राज्य परिवहन महामंडळाला चांगले दिवस येणार असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

ते सेलू येथे नविन बसस्थानकाच्या लोकार्पण प्रंसगी बोलत होते. दिनांक १४ जुन २०२३ रोजी सेलू येथील अत्याधुनिक नुतन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा ऑनलाईन व्दारे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते, उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सेलू येथे खासदार रामदास तडस, नगर पंचायत अध्यक्ष कु. हलताई देवतारे, विभाग नियत्रंक संदीप रायलवार, भाजपा तालुका अध्यक्ष श्री. अशोकजी कलोडे, नगरपंचायत सदस्य रामनारायण पाठक, दिनेश माहुरे, जलतज्ञ मनोहर सोमनाथे, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्रीमती अस्मिता लोगे, अभियंता सुधिर गुल्हाने, वाहतुक निरीक्षक मनोहर वाने, राजेश पिंपळकर, सतिश हिंगे, विनोद राजगुरु, दिनेश कोडापे, वामन मसराम, अतुल शंभरकर, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.