गुजरातपाठोपाठ राजस्थानातही “बिपरजॉय’चा धूमाकूळ

नवी दिल्ली/प्रतिनिधी “बिपरजॉय’ चक्रीवादळाने जरातमध्ये हाहाकार उडवल्यानंतर आता या वादळाचा पाकिस्तान तसेच राजस्थानलाही मोठा फटका बसणार आहे. भारतीय हवामान खात्याने राजस्थानमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी “रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. तसेच उत्तरेकडील राज्यात पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्यान े दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तानमार्गे पुन्हा राजस्थानात परतणार आहे. याच्या प्रभावामुळे राजस्थानात शुकवारी तसेच शनिवारी “रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. यामुळे काही भागात अतिवृष्टी व सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील ९४० हून अधिक गावांना जोरदार दणका देत आणि ताशी १२ किमी वेगाने हे चक्रीवादळ राजस्थानकडे सरकले आहे.

वादळाने मोठ्या प्रमाणात सौराष्ट्र व कच्छच्या परिसरातहानी केली आहे. गुजरात आणि राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्यमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हे चक्रीवादळ १५ जूनरोजी संध्याकाळी साडेसहाच्यासुमारास गुजरातच्या कच्छ-सौराष्ट्रकिनारपट्टीवर धडकले. रात्रीच ते बाडमेरमार्गे राजस्थानला पोहोचले.आयएमडीने सांगितले की, यावेळी१२५ ते १४० किमी प्रतितास वेगानेवादळी वारे वाहत होते. चक्रीवादळामुळे गुजरातच्याकिनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधारपाऊस पडत आहे.

येथून ९४००० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. १५ जहाजे, ७ विमानेआणि एनडीआरएफची टीम येथे सज्ज्ा आहे. आसाम, मेघालय, अरुणाचलप्रदेश, सिक्कीम आणि अंदमान आणिनिकोबार बेटांवर मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित ईशान्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरात प्रदेश, केरळ, किनारी कर्नाटक, कोकण आणि गोवा, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश पंजाबचा काही भाग आणि नैऋत्य राजस्थानमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. १६ जूनपासून नैऋत्य आणि पश्चिम राजस्थानमध्ये पावसाचा जोर वाढेल आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. उत्तरेकडील प ंजाब, हरियाणा, दिल्लीतही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हरियाणा, उत्तर राजस्थान, बिहारचा काही भाग, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि विदर्भ आणि मराठवाड्यात १ किंवा २ ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. १६ जून रोजी अरुणाचल प्रदेश आणि आसाम आणि मेघालयात १७ जूनपर्यंत वेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार बेटांवर वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. १८ आणि १९ जून रोजी उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी गडगडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळाच्या तडाख्याने गुजरातमध्ये वाताहात

नवी दिल्ली/प्रतिनिधी गेल्या दहा दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावणारे बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी (१५ जून) सायंकाळी साडेसहा दरम्यान गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले. यामुळे गुजरातच्या पश्चिमकिनारपट्टीवर मुसळधार पाऊस झाला. तसंच, गुजरातच्या अनेक भागात सोसाट्याचा वारा सुटला होता. परिणामी येथे मोठ्याप्रमाणातवित्तहानी झाली आहे. ११५-१२५ किमी प्रतितास वाऱ्याच्या वेगाने चक्रीवादळाने गुजरातमध्ये प्रवेश केला. यामुळे वृक्ष कोलमडून पडली, विजेचे खांब कोसळले.

परिणामी गुजरातच्या अनेक गावात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. रस्त्यांवर झाडे कोसळल्याने मार्गांवर अडथळेनिर्माण झाले आहेत. जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रशासन कार्यरत झाले आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला होता. सरकारी निवेदनातून त्यांनी गिर जंगलातील सिंह आणि अन्य वन्य प्राण्यांबद्दल चिंताहीव्यक्त केली. दरम्यान, बाधितांना रोख रक्कम, घरगुती वस्तू,निवारा पोहोचवण्याचे आदेश भूपेंद्र पटेल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.