वर्धा नागरी बँक सायबर हल्लाप्रकरणी ५ जणांना अटकवर्धा नागरी बँक सायबर हल्लाप्रकरणी ५ जणांना अटक

वर्धा/प्रतिनिधी येस बँकेशी संलग्न असलेल्या वर्धा नागरी सहकारी बँकेवरसायबर हल्ला करून १ कोटी २१ लाख १६ हजार रुपये विविध बँकखात्यात वळती करण्यात आली होती. याप्रकरणी शहर पोलिसठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास यंत्रणाकामाला लावली. आतापर्यंत पाचआरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २३ लाख १०हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती गुरुवार १५ रोजीपोलिस अधीक्षक यांनी आयोजितपत्रपरिषदेत दिली. २४ मे रोजी सकाळी ६ ते ८.३० वाजता बँकेचे अकाउंटहॅकींर्ग करून आभासी गंडाघालण्यात आला. हा प्रकारबँकेच्या अधिकार्यांना लक्षातयेताच कोर बँकींर्ग सॉफ्टवेअर, फायरवॉल पुरविणारी कंपनी आणिसेटलमेंट बँक म्हणून काम करणारीयेस बँकेच्या मुंबई येथील मुख्य शाखेशी संपर्क साधून माहितीघेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, या प्रकाराचा सुगावा न लागल्याने वर्धानागरी बँकेच्या व्यवस्थापकाने शहरपोलिसात तक्रार दाखल केली.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा नोंद करून वेगाने तपासचक्रफिरविण्यात आले. यादरम्यान,रिझर्व्ह बँकेचे पथक वर्धेत दाखलझाले. पथकाने पाच दिवस चौकशीकेली असता येस बँकेचे आयपी ॲड्रेस मुंबई, हैदराबाद, बँगलोर, दिल्ली येथे दाखविण्यात आले.त्यामुळे सायबर गुन्हे शाखेचेपाच पथके तयार करून मुंबई, हैदराबाद, बँगलोर, दिल्ली येथे पाठविण्यात आले. बँगलोर येथून एका नायजेरियन व्यक्तीस अटक करण्यात आली. दिल्ली येथून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दोघांना अटक करण्यात आली.

तर मुंबईतील भाईंदरमधून पुन्हा दोघांना अटक करण्यात आली. या सर्व आरोपींनी वेगवेगळ्या बँकेत प्रत्येकाचे जवळपास प्रत्येकी १२ ते १५ खाते उघडल्याची माहिती पोलिस अधीक्षक हसन यांनी यावेळी दिली. आरोपींनी वर्धा नागरी बँकेतून १ कोटी २१ लाख १६ हजार रुपये आरटीजीएस व्यवहाराद्बारे २४ बँकांमार्फत ५० ते ६० खात्यांमध्ये वळती केली होती. ही सर्व बँक खाती बंद करण्यात आली आहे. आतापर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले ९ मोबाईल, १६ एटीएम, ४ डीव्हीडी, ३ आधार कार्ड, १ इलेक्शन कार्ड, नायजेरीयन असोसिएशनचे ओळखपत्र, एक्सीटेल कंपनीचे इंटरनेट राऊटर, आयडीएफसी बँकेचे चेकबूक व इतर साहित्य असा एकूण २३ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सायबर शाखेचे एक पथक सध्या हैदराबाद येथे तपास करीत असून पुन्हा एक पथक बँगलोर येथे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली.

हॅकींर्गसाठी वापरले एनी डेस्क सॉफ्टवेअर

येस बँकेशी संलग्न असलेल्या वर्धा नागरी बँकेवर सायबरहल्ला झाला. यात १ कोटी २१ लाख १६ हजार रुपयांची रोखआरटीजीएसच्या माध्यमातून२४ वेगवेगळ्या बँकेतील ५० ते ६० खात्यांमध्ये वळती करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षातघेता रिझर्व्ह बँकेचे एक पथकवर्धेत दाखल झाले. पाच दिवस तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या असून हॅकींर्गसाठी एनी डेस्कसॉफ्टवेअरचा वापर करण्यातआल्याची माहिती पोलिसअधीक्षक नुरुल हसन यांनी यावेळीदिली.