ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नही; जाहिरात वादानंतर शिंदे-फडणवीस एकत्र!

पालघर/प्रतिनिधी राज्यात शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवरून राजकारण चांगलेच तापलं आहे. भाजप आणि शिंदे गट यांच्यात चांगलेच रणकंदन माजलं होत. दरम्यान, आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस एकत्र व्यासपीठावर दिसले आहेत. त्यामुळे या जाहिराती प्रकरणावर फडणवीस यांनी मौन बाळगल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे वेधले होते. मात्र, यावेळी फडणवीस यांनी एका वाक्यात दोघांच्यात आलबेल असल्याचे स्पष्ट केलं. शिवसेनेच्या जाहिरातीनंतर भाजपच्या गोटात नाराजीचे वातावरण होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच कार्यक्रमात उपस्थित आहेत. दोघेही एकाच हेलिकॉप्टरने पालघर येथे कार्यक्रमाला गेले.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा लोकप्रिय उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. सर्वसमान्य लोक शासन आपल्या दारी कार्यक्रमात आले आहेत, त्यांचे आभार मानतो, असे शिंदे म्हणाले. आताचे शासन बदलले आहे. सरकारी कार्यालयात आता खेटे मारायला लागत नाहीत. आपल्या योजना थेट लोकांपर्यंत पोहचल्या पाहीजेत, असा आमचा उपक्रम आहे. मी आणि उपमुख्यमंत्री आधीच्या सरकारमध्ये देखील होतो. आता ३५ लाख लाभार्थ्यांपर्यंत सरकार पोहचले आहे. आमचे सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये फरक आहे.

यावेळी जनतेला संबोधित करताना आमचा एकत्रित प्रवास हा २५ वर्षाचा फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाण साधला. मागचं सरकारं घरी बसलं होतं हे सरकार तुमच्या दारी आलयं. असा टोला ठाकरेंना लगावला. हे सरकार लाखो लोकांपर्यंत पोहचलं आहे. देशातील वितरण व्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदलली. आहे आणि आता ते घट्ट झालं आहे. आम्ही नेहमी एकत्र राहणार. जाहिरातीमुळेआमच्यात दुरावा येणार नाही. आमच्या एकत्र प्रवासाची चिंता नको. कोणत्याही जाहिरातींमुळे वाद होईल इतकं तकालतुन सरकारं नाही.