खचू नका, खूप शिका आणि मोठे व्हा- जिल्हाधिकारी कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी आर्थिक परिस्थितीमुळे खचून न जाता प्राप्त होणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घेत खूप शिकावे आणि समाजात आपले स्थान मोठे करावे, असे उद्गार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्व. पुष्पादेवी भूत मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब गांधी सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने उच्चशालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्यात केले. स्थानिक शिवाजी चौक परिसरातील फाउंडेशन कोचिंग क्लास येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. पंकज भोयर होते. यावेळी, जिल्हाधिकारी कर्डिले व जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती.

रोटरी क्लब व भूत मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टद्वारे ‘बुनियाद – तैयारी ऊंची उडान की’ या प्रकल्पांतर्गत मागील महिन्यात समाजातील आर्थिक परिस्थिती नसलेल्या कुटुंबातील आठवी, नववी व दहावीतील होतकरू विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व इंग्रजी या विषयांसह जेईई, एमपीएससी, यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीकरिता मोफत मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. या उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी आपले अनुभव सांगतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबतही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

वडील शेतकरी आणि घरी बेताचीच परिस्थिती असताना खेडेगावात राहून शालेय शिक्षण घेतले, असे नूरुल हसन यांनी सांगितले. तर खडतर परिस्थितीतही आलेल्या अडचणींवर मात करून, सातत्यपूर्वक अभ्यास करून यश कसे संपादित करायचे, याचा कानमंत्र जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिला. यावेळी अतिथींनी पुढील कारकीर्दीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमासाठी मदत करण्याची ग्वाही यावेळी आ. भोयर यांनी दिली. या बुनियाद प्रकल्पात ८० विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमात दहावी व बारावी बोर्डात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्थानिक तीन विद्यार्थ्यांची अमरावती येथील शिखर एज्युकेअरयेथे आयआयटीच्या मोफतशिक्षणाकरिता निवड करण्यातआली. तर प्रकल्पात सहभागीविद्यार्थ्यांना बुनियाद फाउंडेशनच्याइंग्रजी व गणित विषयाच्या अद्यावतअभ्यासक्रमाची पुस्तके देण्यातआली. कार्यक्रमाला चॅरिटेबल ट्रस्टचेविश्वनाथ भूत, शिखर एज्युकेअरचेसंस्थापक विक्रम खेतान, रोटरीक्लबचे पूर्वप्रांतपाल महेशमोकलकर, रोटरी क्लब गांधीसिटीचे अध्यक्ष शैलेश सिंहलयांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचेसंयोजक गोविंद भूत यांनी केले. संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरीक्लबच्या सचिव नीतू उमरे, साकेतबारगोदिया, आसिफ जहिद, गौरवनालोडे, सुनिता इथापे, संगीताइंगळे, गिरीश टिबडीवाल, अर्चनाचैनानी यांचे सहकार्य लाभले.