काँग्रेस नाही आपणच लढू, वर्धा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी तर्फे हर्षवर्धन देशमुख, सुबोध मोहिते, समीर देशमुख इच्छुक

वर्धा/प्रतिनिधी महाआघाडीच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीची बैठक मुंबईत पार पडली. त्यात वर्धा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसनेच लढवावा, असा एकमुखी सुर उमटला. सध्या काँग्रसकडे असलेल्या या क्षेत्रात राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार लढत देवू शकतात, असा दावा काहींनी केला. पक्षाध्यक्ष शरद पवार तसेच प्रफुल्ल पटेल, अनिल देशमुख, जयंत पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील व अन्य नेत्यांनी वर्धेचा कानोसा घेतला. वर्ध्यात राष्ट्रवादीचा व तोदेखील स्थानिक उमेदवार देवूनच लढवा, असा सार्वत्रिक सूर उमटला. सुबोध मोहिते म्हणाले की, मी रामटेकचा खासदार असताना मोर्शी त्यात येत होता. म्हणून मी लढण्यास पात्र ठरतो, असा दावा झाला.

तर आमदार देवेंद्र भुयार व अन्य नेत्यांनी प्रथम हर्षवर्धन देशमुख किंवा मग समीर देशमुख यांचा विचार करण्याचे सुचविले. यावर एकमत होत नसेल तर मग मी लढण्यास तयार असल्याचे मतसमता परिषदेचे प्रा. दिवाकर गमे यांनी मांडले. सहकार नेते सुधीर कोठारीयांनी वर्धा मतदारसंघात पक्षाची पुरेशी ताकद नसल्याचे स्पष्ट मत नोंदविले. शेवटी पक्षश्रेष्ठींनी ठरवावे.तो जे उमेदवार देतील त्यासाठी सर्वप्रयत्न करू अशी भावना व्यक्त झाली. तीच री अतुल वांदिले यांनीओढली. समीर देशमुख म्हणाले की, पवार साहेब यांच्याकडे भावनाव्यक्त झाल्यात. स्थानिक हवा,यावर एकमत, पण कोण ते सध्या सांगता येणार नाही.