काँग्रेसचा मध्यप्रदेशात हिमाचल, कर्नाटक पॅटर्न

नवी दिल्ली/प्रतिनिधी काँग्रेसच्या महासचिव प्रियांकावढेरा यांच्या जाहीरसभेने काँग्रेसने मध्यप्रदेशातील आपल्या निवडणूकप्रचाराचा शुभारंभ केला. असेकरताना काँग्रेसने आपल्या हिमाचलप्रदेश आणि कर्नाटकमधील पॅटर्नचाअवलंब केला. तेलंगणा, राजस्थान,मध्यप्रदेश आणि छत्तीसगड याचार राज्यांतील विधानसभेच्यानिवडणुका या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. निवडणूक आयोग यानिवडणुकांची घोषणा दिवाळीनंतर करेल, असा अंदाज आहे. असे असतांनाही काँग्रेसने कधी नव्हे, तीसकि”यता दाखवत मध्यप्रदेशातीलआपल्या निवडणूक प्रचाराचे रणशिंगजवळपास सहा महिने आधी फुंकले. हिमाचलप्रद ेश आणि कर्नाटकमधील काँग्रेसच्या निवडणूकप्रचाराचा शुभारंभ प्रियांका वढेरा यांनी केला होता. हिमाचलप्रदेशमध्ये निवडणूक जाहीरझाल्या, तेव्हा राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर होते. त्यामुळे काँग्रेसनेत्यांनी या राज्यातील निवडणूक प्रचाराचा शुभारंभ प्रियांका वढेरा यांच्या हस्ते केला.

त्यांनी हिमाचलप्रदेशातील मा शूलिनी मातामंदिरात पूजाअर्चा करून सोलनयेथे परिवर्तन प्रतिज्ञा सभेला संबोधित केले. कर्नाटकमधील काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचे रणशिंग प्रियांका वढेरा यांनीच फुंकले. या राज्यातही त्यांनी आधी मंदिरात जाऊन पूजापाठ केला. विशेष म्हणजे, या दोन राज्यांत काँग्रेसच्या पाच आश्वासनांची घोषणाही त्यांनीच केली. योगायोग म्हणा की आणखी काही, या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली. त्यामुळे या दोन राज्यांप्रमाणे मध्यप्रदेशातही प्रियांका वढेरा यांच्याच हस्ते निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्याचे काँग्रेसने ठरवले.

सोमवारी प्रियांका वढेरा यांनी जबलपूरच्या गौरीघाटावर पोहोचून नर्मदा नदीच्या किनार्यावर साग”संगीत पूजापाठ केला. नंतर जबलपूरला जाहीरसभेला संबोधित केले. विशेष म्हणजे, याही सभेत त्यांनी हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जी पाच आश्वासने दिली, त्याची घोषणा केली. प्रियांका मध्यप्रदेशातील निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करीत असताना राहुल गांधी देशात नव्हते, तर अमेरिकेच्या दौर्यावर होते.