केन्द्रसरकार व राज्यसरकार ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा देण्याकरिता प्रयत्नरत- खा. रामदास तडस

देवळी/प्रतिनिधी शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य मोबदला मिळावा आणि पिकांमध्ये वैविध्य यावे, यासाठी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २०२३-२४ करिता केन्द्रसरकारने भरीव वाढ केली आहे, केन्द्रसरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत आहे, केन्द्रसरकार व राज्यसरकार ग्रामीण भागाचा विकास करुन लोकांचे जीवनमान आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना तसेच विविध योजनेच्या माध्यमातुन आर्थिक कल्याण सुधारण्याचे कार्य करीत आहे, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना, विविध योजनेच्या माध्यमातुन पायाभूत सुविधांचा विकास करीत आहे, तसेच केन्द्रसरकार व राज्यसरकार शहराबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याकरिता प्रयत्न करीत असल्याचे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

देवळी तालुक्यातील वाटखेड, सिंगारवाडी, काजळसरा व अडेगांव येथे विविध विकास कामाचे भुमीपूजन खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले, अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश बकाने हे होते, कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष दशरथ भुजाडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर गव्हाळकर, राहुल चोपडा, अडेगांव सरपंच सौ. दुर्गाताई कांबळे, काजळसरा सरपंच सौ. नंदाताई संजय बिजवार, रत्नापूरचे उपसरपंच सौरव कडू उपस्थित होते. वाटखेडा येथे २५१५-१२३८ योजनेंतर्गत विकासकामाचे भुमीपूजन, काजळसरा ता.देवळी येथे २५१५-१२३८ अ ंतगर् त विकास कामाचे व जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेंतर्गत भुमीपूजन, सिंगारवाडीयेथे २५१५१२३८ अंतर्गत विकासकामाचे भूमीपूजन, व अडेगाव येथे २५१५-१२३८ अंतर्गत विकास कामे, समाज कल्याण अंतर्गत विकास कामाचा लोकार्पण ,जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विकास कामे व जीवन मिशन पाणी पुरवठा अंतर्गत भूमीपूजन कार्यक्रमाचा समावेश आहे.

यावेळी अडेगांव येथे उपसरपंच अनिल वानखेडे, ग्रामसेवक सुटे, देवराव भाकरे, प्रफुल वानखेडे, राजु सेलसुरकार, नारायण मरसकोल्हे, बालु चव्हाण, संतोश तोटे, काजळसरा येथे उपसरपंच रविंद्र वलके, सदस्य सौ. माधुरीताई दुधे, शिवानी मडावी, शुभम शंभरकर, सोनाली घंगारे, पुजा सांळुके, सौ. विजया पिसुड्डे, ग्रामसेवक मारोतराव डंभारे, रमेश चौधरी, मारोतराव कोरडे, श्रीराम भगत, मानीकराव शियाने, मिलींद चितोडे, शुभम गौरकार, वाटखेडा येथे उपसरपंच वैभव वानखेडे, प्रफुल राउत, विलास भोंग, खुशाल निधेकर, किरण राऊत, अमोल भोंग, उत्तम येले, शंकर शेंद्रे, मारुती उराडे, अमोल राऊत, सिंगारवाडी येथे विशाल मुडे, खटेश्वरराव इंगोले, अमोल इंगोले, अतुल इंगोले, अविनाश काळे, सुधाकर इंगोले व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.