भीषण आग! ड्रीप, पाईप, स्प्रिंकलर जळून खाक; कोट्यवधी रुपयाच्या नुकसानीचा अंदाज

आर्वी/प्रतिनिधी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपुर) येथे सुरु असलेल्या सिंचनाच्या कामासाठी साहित्य ठेवलेल्या स्टोअरेज यार्ड परिसराला भीषण आग लागली. आगीत ड्रीप, पाईप, स्प्रिंकलर जळून खाक झाले. ही घटना १३ रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. आगीत जवळपास कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. धानोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पातून उपसा सिंचनाचे काम सुरु आहे. कामावरील साहित्य एका स्टोरेज यार्ड परिसरात ठेवण्यात आले आहेत. या कामाचे कंत्राट एका कंपनीच्या मार्फत केले जात असून कोट्यवधीचे साहित्य तेथे ठेवले होते. मात्र, दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच इतर साहित्याचं नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या होत्या. वृत्त लिहेस्तोर आग लागल्याचे कारण स्पष्ट झालेले नव्हते. शॉर्ट सकर्ीटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.