विकास कामं झालेच नाहीत? ना. गडकरींनी केले आश्चर्य व्यक्त

वर्धा/प्रतिनिधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीयांची पंडित शंकरप्रसादजीअग्निहोत्री यांनी नागपूर येथे भेट घेऊन विविध विकास कामांसाठी निवेदन दिले. यावेळी ना. गडकरीयांनी ही कामं अजून झालीच नाहीतका असा प्रश्न विचारत आश्चर्यव्यक्त केले. ना. गडकरी यांना दिलेल्यानिवेदनात महाकाली तिर्थक्षेत्राचेब वर्ग तिर्थक्षेत्रात रूपांतर करण्यातयावे तसेच या तिर्थक्षेत्राच्याविकासाकरिता व पर्यटन क्षेत्रम्हणून विकसित करण्याकरिता २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सोयी सुविधांकरिता २ हेक्टर जागा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकार्यांना सुचना करव्या, श्रीवास्तव यांच्या घरापासून ग्रामपंचायत सिदी मेघेपर्यंत अंदाजे ८०० मीटर रस्त्याचे तसेच सिंदी मेघे मधील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून नागठाणामार्गे महामार्गापर्यंत २ किमी रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण, सिमेंटीकरण व विद्युतीकरण करण्यात यावे, गांधी विनोबांचे जीवन दर्शन दर्शविणारे लाईट साऊंड फाऊंटेनची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी डॉ. रोशन ढोरे, डॉ. गजानन जंगमवार, मंगेश झोटिंग, अभिषेक रघुवंशी, गणेश काळे आदींची उपस्थिती होती.