घाट बंद झाले, कधी मिळणार स्वस्तात वाळू

वर्धा/प्रतिनिधी सर्व सामान्यांना स्वस्तातवाळू मिळावी, म्हणून जिल्ह्यात डेपो तयार करण्यात आले. त्या डेपोवरून वाळू मिळविण्याकरिता नागरिकांनी आभासी नोंदणी केली.परंतु, नोंदणी करणार्यांना वाळूदेण्याऐवजी साठेबाजी आणि चढ्या दरात विक्री करणार्यावरभर दिल्याने नोंदणी करणार्यांना प्रतीक्षा कायम आहे. अशातच आता शुक्रवारी रात्रीपासून वाळू घाटातून उपसा बंद करण्यात आल्याने स्वस्तातवाळू मिळणार कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने घर बांधकामाला स्वस्तात वाळू मिळावी आणि वाळू चोरीला आळा बसावा, याकरिता नवे धोरण ठरवून जिल्ह्यात सहा वाळू डेपो सुरू केले. ग्राहकांना या डेपोमधून ६७७ रुपयांत एक ब्रास वाळू मिळण्याचा गाजावाजा करण्यात आला. यामुळे ज्यांनी वाळूकरिता बांधकाम थांबविले होते. अशांना स्वस्तात वाळू मिळणार असल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या.

परंतु, विलंबाने डेपो सुरू झाल्यानंतर डेपोधारकांनी ग्राहकांच्या मागणीला दुय्यम स्थान देत घाटातील वाळू डेपोवर टाकण्याऐवजी थेट चढ्या दराने विकण्यावर आणि साठेबाजी करणार्यावर भर दिला. परिणामी, बुकींर्ग केलेल्या ग्राहकांना आता दहा दिवसांचा कालावधी लोटला तरीही वाळूची प्रतीक्षाच करावी लागत आहे. एकीकडे अनुदानाची प्रतीक्षा आता वाळूसाठी वाटपाहावी लागत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे १० जून ते ३०सप्टेंबरपर्यंत वाळू घाट बंद राहणारअसल्याने ज्यांनी बुकींर्ग केली.त्यांना तरी स्वस्तात वाळू मिळणारका, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. डेपोवर पुरेसा वाळूसाठा नाही.बुकिंग केल्यानंतरही वाळू उपलब्धहोत नाही. काही डेपोवर मशीन किंवा मशीनचा चालक नाहीम्हणून वाळू घेण्याकरिता आलेली वाहने परत पाठविली जातात.अशा विविध प्रकारच्या तक्रारीमहसूल प्रशासनाकडे करण्यातआल्याने गुरुवारी वर्धा आणिहिंगणघाट तालुक्यातील महसूलप्रशासनाच्या अधिकार्यांनी डेपोआणि परिसरातील गस्त घालूनवाहनांची तपासणी केली.