श्रीनगरमध्ये शाळेत अबाया घालण्यावर बंदी, राजकारण तापले!

श्रीनगर/प्रतिनिधी श्रीनगरमध्ये विश्व भारती उच्च माध्यमिक विद्यालयात मुस्लिम मुलींना अबाया परिधान करून प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यानंतर काश्मीरमध्ये राजकारण तापले आहे. गुरुवारी विद्यार्थिनींनी शाळेबाहेर निदर्शने केली. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि नॅशनल कॉन्फरन्सने अबायावरील बंदीवर टीका केली आहे. गुरुवारी दुपारी विश्व भारती उच्च माध्यमिक विद्यालयातील अनेक विद्यार्थिनींनी शाळा व्यवस्थापनाविरोधात निदर्शने केली.

आबाया परिधान केल्यामुळे आपल्याला संस्थेत प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलशाळेचे मुख्याध्यापक मेमरोज शफी यांनी सांगितले की विद्यार्थिनींना सांगण्यात आले की ते घरापासून शाळेत अबाया -लरूर लरपपशव घालू शकतात, परंतु त्यांनी ते शाळेच्या आवारात काढले पाहिजेत. तो गणवेशाचा भाग नाही. गणवेशात पांढरा सलवार कमीज आणि हिजाब आहे. ज्याला डोके झाकायचे नाही, त्याने हिजाब घालू नये. काहीही अनिवार्य नाही. ही विद्यार्थिनींची इच्छा आहे. पण डोके झाकून येणाऱ्यांना पांढरा हिजाब ालावा लागेल. सध्या विद्यार्थिनी वेगवेगळ्या रंगांचे अबाया परिधान करून येतात.महाविद्यालयांमध्ये गणवेश असणे बंधनकारक आहे.