वाळू तस्करांचा युवकावर प्राणघातक हल्ला

देवळी/प्रतिनिधी देवळी तालुक्यात खुलेआम वाळू तस्करी सुरू आहे. या वाळू तस्करांकडे पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी पाठ फिरविली आहे.याचाच परिणाम देवळी पोलीस स्टेशन हद्दीतील वायगाव(निपाणी)येथील दोन वाळू तस्कर अंगत ऊर्फ बालू घायडे व गजानन उर्फ लाला घायडे रा.वायगाव(निपाणी)यांनी त्याच गावात राहणारा युवक संदीप अंबादास वांदिले रा.वायगाव (निपाणी) याला रात्री ९ वाजता च्या दरम्यान तो घराकडे जात असताना दोन्हीही वाळू तस्करांनी त्याला रस्त्यात अडवून तू आमच्या रेतीच्या ट्रॅक्टरची खबर पोलिसांना का देतो असे बोलून त्याला लाठ्या काठ्यांनी गंभीरित्या जखमी केले अशी तक्रार बुधवारी रात्री १० वाजता देवळी पोलीस स्टेशन मध्ये संदीप वांदिले यांनी दिली या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षकांच्या वाळू तस्करावर करडी नजर ने चोहीकडे वाळूचा ठणठणात निर्माण झाला आहे.

त्यामुळे वाळूचे भाव गगनाला भिडले आहे त्यामुळे ाळू तस्करही मिळत असलेल्या अमाप पैशामुळे वाळू तस्करी जोरात करीत आहे आता तर पोलीस प्रशासन व महसूल वभागांनी आपले हात गरम करून या वाळू तस्करांकडे पाठ फिरविली आहे सध्या देवळी शहरात तीन टिप्पर खुलेआम वाळूची तस्करी करीत आहे परंतु पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांच्याकडे हेतू परस्पर पाठ का फिरवत आहे त्यांच्यावर कारवाई का होत नाही आता असे देवळीकर जनतेत चर्चा होऊ लागली आहे.याचाच परिणाम असा झाला की वाळू तस्करांचे हौसले बुलंद झालेले आहे त्यामुळे खुलेआम वाळू तस्कर कोणावरही संशय घेऊन प्राणघातक हल्ले करीत आहे अशा वाळू तस्करांवर शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.